मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bade Miyan Chote Miyan: अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा; टायगर श्रॉफही झळकणार मुख्य भूमिकेत!

Bade Miyan Chote Miyan: अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाची घोषणा; टायगर श्रॉफही झळकणार मुख्य भूमिकेत!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 22, 2023 08:28 AM IST

Bade Miyan Chote Miyan: बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याने त्याच्या आगामी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

Bade Miyan Chote Miyan
Bade Miyan Chote Miyan

Bade Miyan Chote Miyan: बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याने त्याच्या आगामी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने याची माहिती चाहत्यांना आणि प्रेक्षकांना दिली आहे. केवळ घोषणाच नव्हे तर, अक्षयने त्याच्या आगामी चित्रपटाचे म्हणजेच ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’चे शूटिंग देखील सुरू केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत टायगर श्रॉफचीही महत्त्वाची भूमिका आहे. अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. पूजा एंटरटेनमेंट अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ चित्रपटाचा मुहूर्त २१ जानेवारीला मुंबईत झाला. अक्षय कुमारने ट्विटरवर तीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एका फोटोत तो टायगर श्रॉफसोबत पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत तो जॅकी भगनानी आणि अली अब्बास जफरसोबत दिसत आहे. तिसऱ्या फोटोत चित्रपटाचा क्लॅपिंग बोर्ड दिसत आहे. त्यावर अली अब्बास जफर आणि मुहूर्त असे लिहिले आहे. फोटोच्या पार्श्वभूमीत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ लिहिलेले दिसत आहे.

अक्षय कुमारने चित्रपटाबद्दल ट्विट करत लिहिले की, 'मला बडे मियाँ छोटे मियाँचे शूटिंग सुरू करताना खूप आनंद होत आहे.’ यानंतर अक्षय कुमार टायगरची थट्टा करत म्हणाला की, ‘तुझा जन्म झाला त्याच वर्षी मी माझ्या करिअरला सुरुवात केली होती, हे तू शूटच्या वेळी लक्षात ठेव.’

अक्षय कुमार हा बॉलिवूडचा हिट अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा मूळ चित्रपट अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्यावर चित्रित करण्यात आला होता. या दोघांशिवाय या चित्रपटात इतर अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. त्याचबरोबर माधुरी दीक्षितनेही या चित्रपटात एक विशेष डान्स केला होता. गोविंदा आणि अमिताभ यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. चित्रपटातील गाणीही सुपरहिट झाली होती.

IPL_Entry_Point

विभाग