मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Money Laundering Case: २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखरने घेतलं नोराचं नाव! म्हणाला...

Money Laundering Case: २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखरने घेतलं नोराचं नाव! म्हणाला...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 22, 2023 08:07 AM IST

Money Laundering Case: सुकेश चंद्रशेखर याने त्याच्या वकिलामार्फत मीडियाला एक खुले पत्र पाठवले असून, त्यात त्यांनी नोरा फतेहीचे नाव घेत अनेक गुपिते उघड केली आहेत.

Nora Sukesh
Nora Sukesh

Money Laundering Case: सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी सातत्याने अपडेट्स समोर येत आहेत. या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. सुकेश चंद्रशेखर याने त्याच्या वकिलामार्फत मीडियाला एक खुले पत्र पाठवले असून, त्यात त्यांनी नोरा फतेहीचे नाव घेत अनेक गुपिते उघड केली आहेत. कोणत्याही परिस्थितीत सुकेश मला त्याची गर्लफ्रेंड बनवू इच्छित होता, असा आरोप नुकताच नोराने केला होता. यानंतर सुकेशने मीडियाला हे पत्र लिहिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सुकेशने आपल्या पत्रात खुलासा केला की, नोरा फतेही जॅकलिनवर नाराज होती आणि मी जॅकलिनला सोडावे, असे तिला वाटत होते. मीडिया रिपोर्टनुसार, सुकेश म्हणाला की, 'जॅकलिन आणि मी नात्यात होतो आणि त्यामुळेच नोरा जॅकलिनवर चिडायची. नोराने मला जॅकलिनविरुद्ध भडकवायला सुरुवात केली. नोराची इच्छा होती की, मी जॅकलिनला सोडून तिला डेट करावे.’

या पत्रात पुढे लिहिले आहे की, नोरा मला दिवसातून १० वेळा कॉल करत होती, पण मी तिच्या कॉलला उत्तर दिले नाही. ती मला कॉल बॅक करायला सांगायची. याशिवाय सुकेशने सांगितले की, नोराने ईडीसमोर दिलेले वक्तव्यही बदलले आहे. याशिवाय निक्की तांबोळी आणि चाहत खन्ना यांचा उल्लेख पत्रात करत लिहिले की, दोघीही त्याला केवळ व्यावसायिक कामासाठी भेटत होत्या.

यासोबतच सुकेशने असे देखील सांगितले की, 'नोरा खोटे बोलली होती की, तिला माझ्याकडून कार घ्यायची नव्हती, हे सर्वात मोठे खोटे आहे. नोरा मला भेटली तेव्हा तिच्याकडे महागडी कार नव्हती. पण, आम्ही मिळून एक आलिशान कार घेतली, ज्याचे स्क्रीन शॉट्स ईडीकडे आहेत. मात्र, नोराच्या परदेशी नागरिकत्वामुळे ती कार नोराचा मित्र बॉबीच्या नावावर नोंदणीकृत आहे.'

IPL_Entry_Point

विभाग