मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Appi Amchi Collector: अखेर अर्जुनचा भ्रष्टाचार होणार अप्पीसमोर उघड

Appi Amchi Collector: अखेर अर्जुनचा भ्रष्टाचार होणार अप्पीसमोर उघड

Aarti Vilas Borade HT Marathi
May 04, 2023 03:48 PM IST

Appi Amchi Collector Update: आता प्रेक्षकांना नक्कीच प्रश्न पडले असतील कि खरोखर अर्जुनच सत्य अप्पी समोर येणार का व त्या दोघांच्या नात्यावर या गोष्टीचा काही परिणाम होणार ?

Appi Amchi Collector
Appi Amchi Collector

अप्पी आमची कलेक्टर या अतिशय लोकप्रिय मालिकेने, लोकांना आपलंसं केलं. कोणाचाही आधार नसणारी, एका ग्रामीण भागातून आलेल्या मालिकेतील अप्पीचा प्रवास हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेच्या आतापर्यंतच्या भागात आपण पहिले कि अनेक संकटांना तोंड देत अप्पी कलेक्टर झाली. आता खऱ्या अर्थाने तिच्या समोर आव्हाने उभी राहणार आहेत. त्या मुळे या मालिकेला रंजक वळण मिळालं आहे.
वाचा:‘या’ कारणामुळे अरुणा इराणींनी घेतला होता कधीही ‘आई’ न होण्याचा निर्णय! वाचा अभिनेत्रीबद्दल...

सध्याच्या व्हायरल प्रोमो मध्ये प्रेक्षकांनी बघितलंच असेल कि अप्पीने कलेक्टरचा पदभार स्वीकारल्यानंतर सर्वात आधी भ्रष्टचारलिप्त अधिकाऱ्यांच्या फाईल्स मागवते. त्यामुळे आता अर्जुनाचे भ्रष्टचाराचे पितळ उघडे पडलेले आपल्याला दिसणार आहे. पोलीस खात्यात रुजू झालेला अर्जुनने भ्रष्टचाराशी हाथ मिळवणी केली आहे. अनेक वेळा तो अप्पीच्या निदर्शनास येता येता राहिला आहे. पण आता मात्र अर्जुनाची सुटका होणार नाही.

आता प्रेक्षकांना नक्कीच प्रश्न पडले असतील कि खरोखर अर्जुनच सत्य अप्पी समोर येणार का व त्या दोघांच्या नात्यावर या गोष्टीचा काही परिणाम होणार ? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. प्रेक्षकांना त्यांच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकांच्या एका तासाचा विशेष भागात रविवारी मिळणार आहेत.

IPL_Entry_Point

विभाग