मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कलेक्टर अप्पीची उत्तराखंडला झाली बदली, 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अर्जुन देईल का तिची साथ?

कलेक्टर अप्पीची उत्तराखंडला झाली बदली, 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अर्जुन देईल का तिची साथ?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 23, 2024 01:16 PM IST

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. अप्पीची बदली झाली आहे. अर्जुन तिला साथ देणार का? या प्रश्नाचे उत्तर मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहे.

कलेक्टर अप्पीची उत्तराखंडला झाली बदली, 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अर्जुन देईल का तिची साथ?
कलेक्टर अप्पीची उत्तराखंडला झाली बदली, 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अर्जुन देईल का तिची साथ?

झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. कारण अप्पी आणि अर्जुन दोघेही आपल्या जीवनाचे रस्ते वेगवेगळ्या वाटेवर घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. सुजय आणि पियूमुळे सरकारांच सत्य समोर येत. सरकारांनी पैश्यांच्या लोभामुळेच अर्जुनच्या आईची ट्रीटमेंट होऊ दिली नाही. जेव्हा अर्जुनला हे कळते तेव्हा त्याला धक्का धक्का बसतो. शेवटी सरकार त्यांची चुक मान्य करतात. चिडलेला अर्जुन रागाच्या भरात विनायक, अप्पीसोबत आणि अमोलसोबत घरातून बाहेर जायचा निर्णय घेतो. तेवढ्यात सुजय अप्पीला हे सत्य माहित असल्याचे सांगतो. ते ऐकून अर्जुनला आणखी एक मोठा धक्का बसतो.

ट्रेंडिंग न्यूज

अर्जुन जाणार घर सोडून

अप्पी अर्जुनसमोर तिला सत्य माहिती असल्याची कबूली देते. पण अमोलचा जन्म झाला तेव्हा त्याची अदलाबदल झालेली असते. आणि त्यात अर्जुनला हे सत्य सांगून अजून त्रास द्यायचा नव्हता, म्हणून हे सत्य ती त्याच्या पासून लपवते अशी कबूली अप्पी देते. अर्जुन ते ऐकून भयानक चिडतो. अर्जुनने भ्रष्टाचार केलेला तेव्हा त्याने स्वतःचा गुन्हा अप्पीसाठी आणि तिच्या तत्वासाठी मान्य केल्याची आठवण तो तिला करून देतो. पण आता अप्पी स्वतः तिच्या तत्वांना बगल देऊन एवढी मोठी गोष्ट लपवते हे अर्जुनला पचत नाही. अर्जुन तिला सोडून विनायकसोबत घरातून निघतो.
वाचा: मृण्मयी आणि गौतमी देशपांडेचा चिन्मय मांडलेकर याला पाठिंबा, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

स्वप्निल-रुपालीने घेतला अर्जुनशी बोलण्याचा निर्णय

स्वप्निल- रूपाली हे अमोलसाठी एकदा अर्जुनशी बोलायचे ठरवतात. त्याचेवेळी सरकार येऊन अप्पीची माफी मागतात आणि अमोलसाठी सगळे नीट करूया असा विश्वास अप्पीच्या मनात निर्माण करतात. सरकार व अप्पी अर्जुन-विनायकची माफी मागतात. पण अर्जुन कोणाचेही काहीही ऐकून घेत नाही आणि त्यांना तेथून हाकलवून लावतो. बापूंना अप्पीची गोष्ट समजल्याने ते अप्पी व अर्जुनला अमोलसाठी एकत्र येण्याचा सल्ला देतात. पण त्याच दिवशी अप्पीला बदलीचे पत्र येते. तिचे इथले काम बघून तिची उत्तराखंडला बदली केली जाते. तिला ताबडतोब तिथे जावे लागणार असल्याचे कळते. तेव्हा अर्जुनला सोडून जायचे की त्याच्या सोबत जायचे? हा प्रश्न अप्पीसमोर उभा आहे.
वाचा: अंगावर शहारे आणणारा अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ, 'कल्की 2898 एडी' सिनेमातील अश्वत्थामाचा लूक चर्चेत

अप्पी सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. अमोलला बापाची पण गरज असल्याची जाणीव बापू अप्पीला करुन देतात. अप्पी थोड्यावेळाने अर्जुनला तिची बदली झाली असल्याचे सांगते. तेव्हा अप्पीसोबत अर्जुन त्याचे काम सोडून, इथले सगळे आयुष्य सोडून उत्तराखंडला जाणे किंवा इकडेच राहणे असे दोन पर्याय आहे. अप्पीने आईबद्दल गोष्टी लपवल्यामुळे अर्जुन इकडेच राहायच निर्णय घेतो. अर्जुन अप्पीला सांगतो की अमोलला त्याचा बाबा हरवला आहे असे सांग. जेणेकरून तो अप्पीलाच आई व बाबा मानून जगायला शिकणार. जसा अर्जुन स्वतः त्याची आई गेल्यावर विनायकलाच आई-बाबा समजून इतके दिवस जगत होता. अप्पीपुढेही काही पर्याय नसल्याने अप्पी अमोलला घेऊन उत्तराखंडला निघून जाते. अप्पी आणि अर्जुनच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे? ते दोघे पुन्हा एकमेकांजवळ येऊ शकतील का? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत.
वाचा: रंगभूमीवर एक अनोखा प्रयोग! पहिल्या मराठी AI महाबालनाटकामध्ये 'ही' अभिनेत्री करणार काम

IPL_Entry_Point