मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amruta Fadnavis: ‘अज मैं मूड बणा लेया’ अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित

Amruta Fadnavis: ‘अज मैं मूड बणा लेया’ अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 06, 2023 03:33 PM IST

Amruta Fadnavis New Song: अमृता फडणवीस यांनी नव्या वर्षात या गाण्याची घोषणा केली. आता या गाण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. आत अखेर हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस (HT)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी नुकतीच त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली आहे. ‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’ असे या गाण्याचे नाव आहे. आता हे गाणे प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या काही दिवसांपसून अमृता फडणवीस यांच्या या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. त्या पहिल्यांदाच एका पंजाबी गाण्यात दिसणार आहेत. आता हे गाणे प्रदर्शित झाले असून सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी अमृता यांचा लूक, डान्स सर्व काही पाहून कौतूकाचा वर्षाव केला आहे. तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे.
वाचा: शाहरुखची लेक सुहाना खान डेट करते बिग बींच्या नातवाला? फोटो व्हायरल

अमृता यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर गाण्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, 'अज मैं मूड बणा लेया गाणे प्रदर्शित झाले' असे म्हटले आहे. सोबतच गाणे लाइक्स आणि शेअर करण्याचा आवाहान केले आहे.

अमृता फडणवीस यांचे हे नवे गाणे ‘टी सीरिज’ बॅनर खाली बनवण्यात आले आहे. या गाण्यातील त्यांचा लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या लूकमध्ये त्यांनी जीन्स, टॉप व जॅकेट परिधान केले आहे. या फोटोमध्ये त्यांनी हटके फॅशन ज्वेलरी परिधान केली आहे. त्यांच्या हा स्टायलिश लूक पाहून आता चाहते अधिकच उत्सुक झाले आहेत. तर, त्यांचा लूक पाहून नेटकरी देखील प्रतिक्रिया देत आहेत.

अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर, कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. आता ‘अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!’ हे अमृता फडणवीस यांचे गाणे लवकरच रिलीज करण्यात येणार आहे. या आधी देखील त्यांची काही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘शिव तांडव स्रोतम’, ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘कुणी म्हणाले’, ‘तेरी बन जाऊंगी’ या त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली होती.

IPL_Entry_Point

विभाग