मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Akshay Kumar Video: अक्षय कुमार भोलेबाबाच्या चरणी लीन; केदारनाथमध्ये जाऊन घेतलं महादेवाचं दर्शन!

Akshay Kumar Video: अक्षय कुमार भोलेबाबाच्या चरणी लीन; केदारनाथमध्ये जाऊन घेतलं महादेवाचं दर्शन!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 24, 2023 08:44 AM IST

Akshay Kumar At Kedarnath: बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार नुकताच केदारनाथ धामला पोहोचला आहे. केदारनाथला पोहोचताच त्याने भोले बाबाच्या चरणी लीन होत दर्शन घेतलं आहे.

Akshay Kumar At Kedarnath
Akshay Kumar At Kedarnath

Akshay Kumar At Kedarnath: बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार नुकताच केदारनाथ धामला पोहोचला आहे. केदारनाथला पोहोचताच त्याने भोले बाबाच्या चरणी लीन होत दर्शन घेतलं आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. अक्षयने केदारनाथ मंदिरात पोहोचून बाबा भोलेनाथ यांचे आशीर्वाद घेतले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेता त्याच्या सुरक्षा रक्षकांच्या पथकासह मंदिरात जाताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये अभिनेता अक्षय कुमार ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला आहे. तर, अक्षयने कपाळावर लाल आणि पिवळा टिळा लावला आहे. यावेळी अक्षय कुमारची एक झलक मिळवण्यासाठी केदारनाथ मंदिराच्या परिसरात चाहत्यांनी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. यादरम्यान अक्षय मंदिरातून बाहेर आला आणि चाहत्यांना हात जोडून अभिवादन केले. सध्या अक्षय त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी डेहराडूनमध्ये आहे. मंगळवारी अभिनेता हेलिकॉप्टरने केदारनाथ धामला पोहोचला होता.

यापूर्वी अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केदारनाथ मंदिराचा फोटो शेअर केला होता. ही पोस्ट शेअर करत त्याने 'जय बाबा भोलेनाथ' असे कॅप्शन लिहिले होते. अभिनेत्याच्या या फोटोवर चाहते प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत. अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो अखेर इमरान हाश्मीसोबत ‘सेल्फी’ या चित्रपटामध्ये झळकला होता. या चित्रपटात अभिनेत्री डायना पेंटी आणि नुसरत भरुचाही महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकल्या होत्या. मात्र, त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. आता अक्षयकडे 'कॅप्सूल गिल', 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'ओह माय गॉड २' असे बिग बजेट चित्रपट आहेत.

IPL_Entry_Point

विभाग