
Aditya Singh Rajput Funeral: टीव्ही अभिनेता आदित्य सिंह राजपूत याने वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. ‘स्प्लिट्सविला’ फेम अभिनेता आदित्य सोमवारी त्याच्या अंधेरीतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. आदित्य त्याच्या बाथरूममध्ये फरशीवर संशयास्पद स्थितीत दिसला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अभिनेत्याच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीत सध्या शोककळा पसरली आहे. काही काळापूर्वी हसता-खेळणारा आदित्य आता या जगात नाही, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये.
अभिनेता आदित्य सिंह राजपूत याच्या निधनामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब दु:खी झाले आहे. दरम्यान, आदित्यच्या बहिणीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या भावाला सरणावर पाहून धायमोकलून रडताना दिसत आहे. आदित्यच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याची आई दिल्लीहून तातडीने मुंबईला पोहोचली होती.
आदित्य सिंह राजपूत यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भावाच्या विरहाने बहिणीची अवस्था रडून रडून वाईट झाली आहे. आदित्यच्या बहिणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती कोणालातरी मिठी मारून रडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आदित्यच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य रडताना दिसत आहे. आदित्यच्या अंत्यसंस्कारा दरम्यानचा हा व्हिडीओ पाहून सर्वांचेच हृदय हेलावले आहे. या व्हिडीओवर कमेंट करून युजर्स आदित्यच्या बहिणीला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत.
आदित्य सिंह राजपूत याच्यावर २३ मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबासोबतच टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक लोक उपस्थित होते. अशोक पंडित, करण जोतवानी यांच्यासह ‘बिग बॉस १५’ फेम राजीव अदातिया, ‘पिशाचिनी’ फेम अभिनेता हर्ष राजपूत यांच्यासह अनेक कलाकार मित्रमंडळी त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते.
संबंधित बातम्या
