मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sushmita Sen: ललित मोदी ऑक्सिजनवर अन् सुष्मिता सेनने खरेदी केली कोट्यवधींची कार! चाहते म्हणाले...

Sushmita Sen: ललित मोदी ऑक्सिजनवर अन् सुष्मिता सेनने खरेदी केली कोट्यवधींची कार! चाहते म्हणाले...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 22, 2023 11:35 AM IST

Sushmita Sen: सुष्मिता सेनने आपल्या आलिशान कारची झलक दाखवण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Sushmita Sen bought Mercedes-Benz GLE
Sushmita Sen bought Mercedes-Benz GLE

Sushmita Sen bought Mercedes-Benz GLE: गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. आता सुष्मिता चर्चेत आलीये ती तिच्या नव्या लक्झरी कारमुळे... सुष्मिता सेनने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या नवीन कारसोबत पोज देताना दिसत आहे. सुष्मिताची ही नवी गाडी मर्सिडीज AMG GLE ५३ कूप आहे. या गाडीची किंमत १.९२ कोटी रुपये आहे. या आलिशान गाडीसोबत ती पोज देतानाही दिसत आहे. तिने काळ्या रंगाची मर्सिडीज कार खरेदी केली असून, या व्हिडीओमध्ये ती काळ्या रंगाचे कपडे परिधान करून कारसमोर पोज देताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सुष्मिता सेनने आपल्या आलिशान कारची झलक दाखवण्यासाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती अनेक लोकांना भेटतानाही दिसत आहे. सुरुवातीला तिची गाडी झाकून ठेवण्यात आली होती. यानंतर सुष्मिता सेन आली आणि तिने कारवरचे कव्हर काढले. यावेळी सुष्मिताने गाडीच्या रंगाला मॅचिंग आऊटफिट आणि सनग्लासेसही घातलेले होते. यानंतर सुष्मिता सेनला कारची चावी आणि टीमकडून गिफ्ट हॅम्पर देण्यात आले. या गाडीसोबत फोटो काढताना सुष्मिता खूप आनंदी दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून ललित मोदींसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होती. ललित मोदी यांनी गेल्या वर्षी ट्विट करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनी काही फोटो शेअर करत आपण सुष्मिता सेनला डेट करत असल्याचे म्हटले होते. यासोबतच त्याने सुष्मितासोबतचे काही फोटोही शेअर केले होते. नंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्याही समोर आल्या. पण, त्यावर दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सध्या ललित मोदी यांना कोरोना झाला असून, ते रुग्णालयात आहेत. त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. अशातच सुष्मिता सेन हिने महागडी कार खरेदी केल्याने अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुष्मिताच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. नावे आलिशान गाडी खरेदी केल्याबद्दल सगळ्यांनीच सुष्मिताआ शुभेच्छा दिल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग