मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16: प्रियांका-शिव नाही तर, ‘बिग बॉस १६’च्या शर्यतीत नंबर वनसाठी प्रेक्षकांची ‘या’ सदस्याला पसंती!

Bigg Boss 16: प्रियांका-शिव नाही तर, ‘बिग बॉस १६’च्या शर्यतीत नंबर वनसाठी प्रेक्षकांची ‘या’ सदस्याला पसंती!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 22, 2023 09:38 AM IST

Bigg Boss 16 : वादग्रस्त शो ‘बिग बॉस १६’ आता त्याच्या अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. लवकरच या खेळाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.

Bigg Boss 16 Updates
Bigg Boss 16 Updates

Bigg Boss 16: छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस १६’ आता त्याच्या अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. लवकरच या खेळाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. प्रेक्षक आठवडाभराच्या खेळाच्या आधारावर घरातील टॉप स्पर्धक निवडू शकतात. दर आठवड्यात असे काही स्पर्धक निवडले जातात. या आठवड्याच्या टॉप स्पर्धकांची यादी जाहीर झाली आहे. अनेकांना वाटलं की, यात शिव ठाकरे किंवा प्रियांका चौधरी चहर हिने नंबर वन पटकावला असेल. मात्र, यंदा नंबर वनसाठी प्रेक्षकांनी दुसऱ्याच नावाला संधी दिली आहे.

एका लोकप्रिय पोर्टलने शोमधील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धकांची यादी जाहीर केली. या यादीत १४ ते २० जानेवारीपर्यंतचा डेटा समाविष्ट आहे. या आठवड्यात एमसी स्टॅनने सर्वांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. एमसी स्टॅनने प्रियंका आणि शिवलाही मागे टाकले आहे. मात्र, प्रियांकाने या क्रमवारीत शिवला देखील मागे टाकले आहे.

या शोमध्ये फारच कमी योगदान असल्याचा आरोप एमसी स्टॅनवर सातत्याने झाला. मात्र, तरीही तो या आठवड्यात अव्वल ठरला आहे. शोमध्ये एन्ट्री केल्यानंतर अनेक दिवस तो मला घरी जायचे आहे, असे वारंवार म्हणत होता. पण, त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला असून, त्यामुळे या आठवड्यातही तो घरातील टॉप स्पर्धकांमध्ये राहिला आहे. स्टॅनची स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या घरातील त्याचे डायलॉग्सही लोकप्रिय होत आहेत.

या क्रमवारीत दुसरा क्रमांक प्रियांका चहर चौधरीने पटकावला आहे. बऱ्याच दिवसांपासून बिग बॉस १६मध्ये प्रियांका एकटी खेळताना दिसत आहे. या आठवड्यात ती शालीन आणि टीना यांच्यातील वाद मिटवताना दिसली होती. अनेकांनी विजेता म्हणून प्रियांकाचे नाव घेतले आहे. तर, काहींना तिनेच हा शो जिंकावा असे वाटत आहे.

शिव ठाकरे ‘बिग बॉस १६’च्या सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. मात्र, या आठवड्यात तो तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. यावेळी त्याला अब्दू रोजिकची जागा मिळाली आहे. या यादीत अर्चना गौतम चौथ्या क्रमांकावर, तर टीना दत्ता पाचव्या क्रमांकावर आहे.

IPL_Entry_Point