मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही!- हेमांगी कवी

तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही!- हेमांगी कवी

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 14, 2022 01:37 PM IST

हेमांगी कवीने आंबेडकर जयंतीनिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

हेमांगी कवी
हेमांगी कवी (HT)

भारतीय राजकारणात भीमराव रामजी आंबेडकर यांचे महत्त्व वेगळे सांगायला नको. १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील महू येथे रामजी व भीमाबाई सकपाळ यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. आज त्यांची १३१वी जयंती. त्यानिमित्ताने अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री हेमांगी कवीने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून हेमांगी कवी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सामाजिक विषयावर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. आता हेमांगीने आंबेडकर जयंतीनिमित्त केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब!' असे हेमांगीने पोस्टमध्ये म्हटले आहे. हेमांगीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. काहींनी तिच्या वक्तव्यला सहमती दर्शवली आहे.

गेल्या दोन वर्षात जगभरात करोना व्हायरसने उच्छाद मांडला होता. या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाउनसारख्या परिस्थितीमुळे सगळ्याच सण-उत्सवांवर विरजण पडले होते. गेल्या दोन वर्षात १४ एप्रिल अर्थात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरच्या घरीच साजरी करण्यात आली होती. पण यंदा मोठ्या जल्लोषात ती साजरी केली जात आहे.

IPL_Entry_Point