मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bamboo Trailer: अभिनयला मिळणार त्याचं खरं प्रेम की लागणार ‘बांबू’?

Bamboo Trailer: अभिनयला मिळणार त्याचं खरं प्रेम की लागणार ‘बांबू’?

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 14, 2023 08:20 AM IST

Bamboo: बांबू या चित्रपटात समीर चौघुले महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

बांबू ट्रेलर
बांबू ट्रेलर (HT)

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनेता अभिनय बेर्डे हा सतत त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा 'मन कस्तूरी रे' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी प्रकाश महत्त्वाच्या भूमिकेत होते. आता या पाठोपाठ अभिनयचा 'बांबू' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आपल्या आजुबाजुला असा एकतरी मित्र असतो, ज्याचे प्रेमात बांबू लागलेले असतात. प्रेमातील हाच अनुभव बांबू या चित्रपटात सांगण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये अभिनय बेर्डे आपल्याला एका साध्या मुलाच्या भूमिकेत दिसतोय. जो प्रेमभंगाच्या काळात प्रत्येक मुलीला रडायला खांदा देतोय. प्रत्येक मुलगी त्याला ‘त्या’ नजरेनं कधी बघतंच नाहीए. खऱ्या प्रेमाच्या शोधात असतानाच त्याच्या आयुष्यात ‘त्या’ नजरेनं बघणारी मुलगी येते. मात्र या प्रेमात मित्र पार्थ भालेराव प्रेमाच्या आड येताना दिसतोय. आता अभिनयला त्याचं खरं प्रेम मिळणार का, की प्रेमात बांबू लागणार, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.

ट्रेलरमध्ये तेजस्विनी पंडितचीही झलक दिसत आहे. आता तिची यात काय भूमिका आहे, हे २६ जानेवारीलाच कळेल. अभिनय बेर्डे, पार्थ भालेराव आणि वैष्णवी कल्याणकर यांच्यासोबतच शिवाजी साटम, समीर चौघुले, अतुल काळे आणि स्नेहल शिदम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग