मराठी बातम्या  /  निवडणुका  /  PM Modi : काँग्रेसचा आता सर्वसामान्यांच्या संपत्तीवर डोळा! सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून मोदी यांची टीका

PM Modi : काँग्रेसचा आता सर्वसामान्यांच्या संपत्तीवर डोळा! सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून मोदी यांची टीका

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 24, 2024 03:43 PM IST

pm narendra modi attacks rahul gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी निवडणूक प्रचारसभेत सुरगुजा येथे एका सभेला संबोधित करताना सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.

वारसा हक्क कायद्याने तुमच्या मुलांचा हिस्सा काँग्रेस हिरावून घेईल, पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका
वारसा हक्क कायद्याने तुमच्या मुलांचा हिस्सा काँग्रेस हिरावून घेईल, पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका (BJP media)

pm narendra modi attacks rahul gandhi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे. वारसा करासंदर्भात सॅम पित्रोदा यांनी केलेल्या या विधानामुळे भारतीय जनता पक्ष व काँग्रेस यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू झाले आहे. सॅम पित्रोदा यांनी एएनआयशी बोलताना वारसा करासंदर्भात केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला असून या विधानाचा समाचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.

Indian railway : आता जनरल डब्यातील प्रवाशांनाही मिळणार स्वस्त आणि मस्त जेवण; भारतीय रेल्वेची भन्नाट योजना

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील वारसा कराचा हवाला देऊन भारतातही यावर चर्चा करण्याबाबत विधान केले होते. यावरून हा वाद असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या छत्तीसगडमधील सुरगुजा येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेस वर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसला मृत्यूनंतरही कराचा बोजा लादायचा आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे की, मृत्यूनंतर वारसा कर लावला जाईल. अशा प्रकारे तुमच्या मुलांना वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीवरही काँग्रेस लक्ष ठेवून आहे, अशी टीका मोदी यांनी केली.

IMD heatwave alert : काळजी घ्या! २७ एप्रिलपासून मुंबई, ठाणे, रायगडमध्ये उष्णतेची लाट; हवामान विभागाचा इशारा

नरेंद्र मोदी म्हणाले, 'राजघराण्यातील राजकुमाराच्या सल्लागाराने काही काळापूर्वी मध्यमवर्गीयांवर जादा कर लावला जावा असे म्हटले होते. मात्र, आता काँग्रेस वारसा कर सर्वसामान्य नागरिकांवर लादणार आहे. वाडीलोपार्जित मिळालेल्या संपत्तीवर काँग्रेस वारसांवर कर लावणार आहे.

मोदी म्हणाले, 'जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, तोपर्यंत काँग्रेस तुमच्यावर जास्त कर लावेल आणि तुम्ही हयात नसाल तेव्हा देखील तुमच्यावर वारसा कराचा बोजा काँग्रेस लावणार आहे. ज्यांनी संपूर्ण काँग्रेस पक्ष आपली वडिलोपार्जित मालमत्ता समजून राजपुत्राला दिली ते आता सर्वसामान्य भारतीयांना त्यांची मालमत्ता त्यांच्या मुलांना देण्यापासून वंचित ठेवणार आहे.

नरेंद्र मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व कळलं असतं तर…; प्रियांका गांधी यांचा घणाघात

सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस अडचणीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी या विषयावरून काँग्रेसवर टीका केल्याने आता हे प्रकरण आणखी चिघळणार आहे. काँग्रेसलाही हे समजल्याने त्यांनी सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यापासून हात झटकले आहेत. जयराम रमेश यांनी ट्विट करून सॅम पित्रोदा यांचे वक्तव्य वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे.

सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेचा उल्लेख करताना म्हटले होते की, अमेरिकेत देखील वारसा कर आकारला जातो. पित्रोदा म्हणाले होते, 'अमेरिकेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची ५५ टक्के संपत्ती सरकारकडे जाते आणि केवळ ४५ टक्के संपत्ती ही वारसा हक्काने मुलांना मिळते. पण भारतात तसे नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची पूर्ण संपत्ती मुलांना मिळते. लोकांना काहीच मिळत नाही. अशा मुद्द्यांवर लोकांनी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. त्यातून काय अंतिम निष्कर्ष निघेल हे मला माहिती नाही. आम्ही जेव्हा संपत्तीच्या पुनर्वाटपाची चर्चा करतो, तेव्हा आम्ही अशा नव्या धोरणांचा विचार करत असतो, ज्यांचा फायदा काही मूठभर श्रीमंतांना न होता गरीबांना होईल”, असंही सॅम पित्रोदा यांनी यावेळी नमूद केलं होतं.

WhatsApp channel