मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DC vs SRH Live Streaming: दिल्ली कॅपिटल्सची आज सनरायझर्स हैदराबादशी लढत; कधी, कुठे पाहायचा सामना?

DC vs SRH Live Streaming: दिल्ली कॅपिटल्सची आज सनरायझर्स हैदराबादशी लढत; कधी, कुठे पाहायचा सामना?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 20, 2024 04:01 PM IST

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएलमधील ३५वा सामना खेळला जाणार आहे.

आयपीएल २०२४: दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज लढत पाहायला मिळणार आहे.
आयपीएल २०२४: दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज लढत पाहायला मिळणार आहे.

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League 2024) सतराव्या हंगामातील ३५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad) एकमेकांशी भिडणार आहेत. दिल्लीतील (Delhi) अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळला जाणारा हा कधी आणि कुठे खेळला जाईल, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबाद ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सचे ६ गुण आहेत. दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, चार सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

CSK vs LSG : आयपीएल २०२४ मध्ये असं पहिल्यांदाच घडलं! 'या' चुकीसाठी ऋतुराज गायकवाड आणि केएल राहुलला दंडाचा दणका

कधी, कुठे पाहायचा सामना?

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शनिवारी (२० एप्रिल २०२४) आयपीएलमधील ३५ वा सामना खेळला जाईल. हा सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामना सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

LSG vs CSK Head to Head : लखनौ की सीएसके कोणता संघ मजबूत, एकना स्टेडियमची पीच कशी असेल? संपूर्ण माहिती येथे पाहा

दिल्ली कॅपिटल्सचा संघ:

ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, सुमित कुमार, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद, कुमार कुशाग्र, प्रवीण दुबे , ललित यादव, लिझाद विल्यम्स, डेव्हिड वॉर्नर, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्खिया, यश धुल, मिचेल मार्श, रिकी भुई, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा.

सनरायझर्स हैदराबादचा संघ

हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट, टी नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंह, ग्लेन फिलिप्स , राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंह, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंह, मयंक अग्रवाल.

IPL_Entry_Point