Rohit Sharma PBKS vs MI : आयपीएल २०२४ च्या ३३ व्या सामन्यात (१८ (एप्रिल) पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. हा सामना सुरु होताच मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. त्याने एक खास पराक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे, रोहित शर्मा आधी हा विक्रम केवळ महेंद्रसिंह धोनी यानेच केला आहे.
रोहित शर्मा हा आयपीएलचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याने ६ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तो २००८ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध खेळला जाणारा सामना हा रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतील २५० वा सामना आहे.
रोहित शर्माशिवाय एमएस धोनी हा आयपीएलमधील एकमेव खेळाडू आहे ज्याने आयपीएलमध्ये २५० किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २५६ सामने खेळले आहेत.
एमएस धोनी - २५६ सामने
रोहित शर्मा - २५० सामने
दिनेश कार्तिक - २४९ सामने
विराट कोहली - २४४ सामने
रवींद्र जडेजा - २३२ सामने
रोहित शर्माने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३०.१० च्या सरासरीने ६४७२ धावा केल्या आहेत. या दरम्याने त्याने १३१ च्या स्ट्राइक रेटने ४२ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत. त्याचवेळी, रोहित शर्माने आयपीएलच्या या हंगामात ६ सामन्यात ५२.२० च्या सरासरीने २६१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.