LSG vs CSK Pitch Report : आयपीएल २०२४ चा ३४ वा सामना आज (१९ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. लखनौ येथील अटल बिहारी एकना स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजेपासून दोन्ही संघ आमनेसामने येतील.
दोन्ही संघ प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दावेदार आहेत, मात्र त्यासाठी त्यांना अजून काही सामने जिंकावे लागतील.
दरम्यान, या सामन्याआधी लखनौची खेळपट्टी कशी असू शकते आणि दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड्सचा आढावा आपण येथे घेणार आहोत.
लखनौने आतापर्यंत दोन आयपीएल खेळले आहेत आणि यावेळी ते तिसऱ्यांदा यात सहभागी होत आहे. जर आपण CSK आणि LSG यांच्या हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोललो, तर आतापर्यंत त्यांच्यामध्ये फक्त ३ सामने झाले आहेत. यापैकी दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला असून एका सामन्याचा निकाल लागला नाही.
म्हणजेच, दोन्ही संघ बरोबरीत आहेत. लखनौने चेन्नईविरुद्ध २११ धावांची सर्वोच्च धावसंख्या केली आहे, तर चेन्नईने लखनऊविरुद्ध २१७ धावांची सर्वोच्च धावसंख्या केली आहे. यातही म्हणजे दोन्ही संघ कमी दिसत नाहीत.
लखनौच्या पीचवर जो संघ प्रथम फलंदाजी करेल त्याचा फायदा होईल. यामुळेच केएल राहुलच्या संघाने आतापर्यंत तीनदा नाणेफेक जिंकली आहे आणि प्रत्येक वेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी दोन सामने जिंकण्यात संघाला यश आले, तर एका सामन्यात पराभव पत्करावा लागला.
लखनौच्या खेळपट्टीवर गोलंदाजांसाठी खूप काही आहे आणि ते फलंदाजांना अडचणीत आणू शकतात. मात्र, फलंदाजांनी सावध खेळ केल्यास धावाही होऊ शकतात. तसेच, फिरकीपटूही आपला प्रभाव पाडतात.
पॉइंट टेबलबद्दल बोलायचे झाले तर CSK ने या वर्षी आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी ३ जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. या संघाचे ८ गुण आहेत आणि ते गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर एलएसजीने आत्तापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ३ जिंकले आहेत आणि ३ सामने गमावले आहेत. संघाचे एकूण ६ गुण आहेत. संघ पाचव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ पुढील सामना जिंकून आणखी दोन गुण मिळविण्याचा प्रयत्न करतील.
संबंधित बातम्या