मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Facebook : तुमचं फेसबुक पेज कोण पाहतं?; ‘या’ स्टेप्स फॉलो करून चुटकीसरशी घ्या माहिती

Facebook : तुमचं फेसबुक पेज कोण पाहतं?; ‘या’ स्टेप्स फॉलो करून चुटकीसरशी घ्या माहिती

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Feb 20, 2023 12:28 PM IST

Facebook : फेसबूक तुमचं प्रोफाईल कोण पाहतयं हे दिसत नाही. पण आम्ही तुम्हाला अशी ट्रीक सांगणार आहोत की ज्यातून तुम्हाला कळेल की तुमची प्रोफाईल कोण पाहतय ते -

facebook HT
facebook HT

Facebook : फेसबुक हे जगभरात लोकप्रिय अॅप आहे. भारतातील लोकांनाही ते खूप आवडते. जुने मित्र आणि नातेवाईक यांच्याशी जोडण्यासाठी हे व्यासपीठ खूप उपयुक्त आहे. यासोबतच तुम्ही जुन्या सहकाऱ्यांशी किंबहुना दूर राहूनही जगाच्या पाठीवर असलेल्या तुमच्या मित्र मैत्रिणींशी, नातेवाईकांशीही कनेक्ट राहता येत.

ट्रेंडिंग न्यूज

या फेबुवर जेंव्हा तुम्ही लाॅग इन करता तेंव्हा तुम्हाला कळत नाही की नेमकं कोण तुमची प्रोफाईल पाहत आहे ते. किंबहुनृा तसं पाहण्याचा कोणताही विशिष्ट मार्ग नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला युक्ती सांगणार आहोत.

या आहेत स्टेप्स ज्यातून तुम्हाला कळेल कोण तुमच्या मागावर आहे ते -

- फेसबुकमध्ये अनेक वेळा लोक एकमेकांच्या प्रोफाइलमध्ये डोकावतात. नेमकं कोण तुमची प्रोफाईल कोणत्या वेळी व्हिजिट करत याची सूचना फेसबुकने युजर्सना दिलेली नाही. पण, ते एका युक्तीने शोधता येते.

- या ट्रिकसाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपची मदत घ्यावी लागेल. ही युक्ती तुम्ही मोबाईलवर करू शकत नाही. अशा परिस्थितीत, ही स्टेप बाय स्टेप पद्धत फाॅलो करा.

- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ब्राउझरमध्ये फेसबुकवर लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला तुमचे फेसबुक खाते उघडावे लागेल. येथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतील.

- तथापि, तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर जाऊन राईट क्लिक करावे लागेल आणि त्यावर मेनूची यादी उघडेल. या यादीतून तुम्हाला 'व्ह्यू पेज सोर्स'वर जावे लागेल. तुम्ही त्यावर CTRL+U कमांडद्वारे देखील जाऊ शकता.

- यानंतर तुम्हाला CTRL+F ने BUDDY_ID शोधायचा आहे. यानंतर तुम्हाला त्याच्या पुढे १५ अंक मिळतील. त्याला कॉपी करावी लागेल. अंक कॉपी केल्यानंतर https://www.facebook.com/ या यूआरएल मध्ये टाकावा लागेल आणि नंतर तुम्हाला कळेल की तुमचे प्रोफाईल सध्या कोण पाहतंय ते.... त्यामुळे या स्टेप्स फाॅलो करा आणि स्पाय पासून वाचा.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग