मराठी बातम्या  /  business  /  Whatsapp update : मस्तच! व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगसाठी आता फोन नंबरची गरज नाही!
Whatsapp
Whatsapp

Whatsapp update : मस्तच! व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगसाठी आता फोन नंबरची गरज नाही!

25 May 2023, 18:14 ISTGanesh Pandurang Kadam

Whatsapp new update : जगभरातील सरकारकडून सोशल मीडियावर घातली जाणारी बंधनं लक्षात घेऊन सर्वच कंपन्या युजर्सची गोपनीयता राखण्याकडं लक्ष देऊ लागल्या आहेत.

Whatsapp new update : जगातील सध्याचा सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशी ओळख असलेले व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सना अधिकाधिक चांगला अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील असते. त्याचबरोबर, व्हॉट्सअ‍ॅप गोपनीयतेला देखील प्राधान्य देत असते. त्याचाच एक भाग म्हणून व्हॉट्सअ‍ॅपची मालक कंपनी 'मेटा' लवकरच एक नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्याला संदेश पाठवण्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक असणं अनिवार्य आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर दुसऱ्याचा नंबर जसा आपल्याला कळतो, तसंच आपणही एखाद्याला मेसेज पाठवल्यावर आपला नंबर आपोआप शेअर होतो. तसं झाल्यामुळं अनावश्यक लोकांकडं नंबर जाऊन त्याचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी 'मेटा' नवं फीचर आणणार आहे. त्या फीचरमुळं एखाद्या युजरनं व्हॉट्सअ‍ॅप मेसेज केला तरी त्याच्या मोबाइल नंबरऐवजी त्याचं नाव समोरच्याला दिसणार आहे.

Netflix Password : पासवर्ड शेअर केला तर नेटफ्लिक्स वसूल करेल दुप्पट पैसे, महसूल वाढवण्यासाठी अशी केली सक्ती

या फीचरवर सध्या काम सुरू आहे. ते प्रत्यक्षात आल्यानंतर युजर्सना त्यांचं नाव सेट करावं लागणार आहे. Instagram किंवा Twitter वापरणारे ज्याप्रमाणे आपल्या खात्यासाठी नावाचा पर्याय निवडतात, त्याचप्रमाणं त्यांना व्हॉट्सअ‍ॅपसाठी एक युनिक नाव शोधावं लागणार आहे. येत्या काही दिवसांत संपर्क क्रमांकाच्या जागी हे युजर नेम दिसेल आणि व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्याला मेसेज करण्यासाठी त्याच्या फोन नंबरची गरज लागणार नाही.

अ‍ॅप सेटिंग्जमध्ये असेल नवा पर्याय

या संदर्भातील अहवालानुसार, अ‍ॅप सेटिंग्जमध्ये युजर्सना त्यांचं 'युजर नेम' सेट करण्याचा पर्याय दिला जाईल, ज्याच्या मदतीनं युजर इतरांशी कनेक्ट होऊ शकतील. हे युजर नेम चॅटिंग अ‍ॅपवर ओळख म्हणून काम करेल आणि त्याच्याशी संबंधित सेटिंग्ज प्रोफाइल विभागाचा भाग बनवता येतील. सध्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना त्यांचं नाव, प्रोफाइल फोटो किंवा स्टेटस बदलण्याचा पर्याय उपलब्ध आहे. एखाद्याचा नंबर दुसऱ्याकडं नसला तरी तो त्याला दिसू शकतो.

मोबाईल नंबरचं काम संपेल

एकदा युजरनेम निवडलं की व्हॉट्सअ‍ॅप युजरचं मोबाइल नंबरवरील अवलंबित्व पूर्णपणे संपेल. केवळ ओळख जाणून घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप फोन नंबरची मदत घेईल, पण तो नंबर इतरांशी शेअर केला जाणार नाही. अ‍ॅपवर फोन नंबरऐवजी युजरनेम दाखवलं जाईल आणि या युजरनेमच्या मदतीनं कोणाशीही चॅटिंग सुरू करता येईल. व्हॉट्सअ‍ॅपवर युजरनेमशी संबंधित यंत्रणा कशी काम करेल, यासंबंधीची संपूर्ण माहिती येत्या काही आठवड्यांत समोर येण्याची शक्यता आहे.

विभाग