Netflix Password : पासवर्ड शेअर केला तर नेटफ्लिक्स वसूल करेल दुप्पट पैसे, महसूल वाढवण्यासाठी अशी केली सक्ती
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Netflix Password : पासवर्ड शेअर केला तर नेटफ्लिक्स वसूल करेल दुप्पट पैसे, महसूल वाढवण्यासाठी अशी केली सक्ती

Netflix Password : पासवर्ड शेअर केला तर नेटफ्लिक्स वसूल करेल दुप्पट पैसे, महसूल वाढवण्यासाठी अशी केली सक्ती

May 24, 2023 11:39 PM IST

Netflix Password : नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअरिंग करणाऱ्या यूजर्सना आता अधिक दंड आकारण्यात येणार आहे. कंपनी जवळपास १०० देशांमध्ये ही सक्ती केली आहे.

netflix HT
netflix HT

Netflix Password : जे यूजर्स नेटफ्लिक्स खात्याचा पासवर्ड मित्र, नातेवाईक, शेजारी किंवा कुटुंबाबाहेरील इतर कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करतात त्यांच्याकडून जास्त पैसे आकारले जाणार आहेत. नेटफ्लिक्सने यासंदर्भात निवेदन जाहीर केले आहे. त्यानुसार, प्रत्येक यूजर्ससाठी एक खाते असणार आहे. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म १०० देशांमध्ये या नियमाची अंमलबजावणी करणार आहे. एवढेच नाही तर, पासवर्ड शेअर केल्यास यापुढे खाते ब्लॉक होईल असेही यात म्हटले आहे.

१०० पेक्षा जास्त देशांमध्ये नियमाची अंमलबजावणी

नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंगवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. घराबाहेरचा अतिरिक्त सदस्य जो घराच्या बाहेर नेटफ्लिक्सची सेवा घेऊ शकतो, त्याला प्रत्येक महिन्याला अतिरिक्त ७.९९ डाॅलर्सचा भूर्दंड पडेल. सध्या ऑस्ट्रेलियासह १०० देशांमध्ये यासंदर्भात किंमत आणि प्रक्रिया सुरू होणार आहे. लवकरच हा नियम भारतातही लागू होऊ शकतो.

नेटफ्लिक्सने मंगळवारी इतर लोकांसोबत त्यांचे पासवर्ड शेअर करणार्‍या वापरकर्त्यांवर कारवाईचा बडगा उगारला. कंपनीच्या महसूलावर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

कंपनीकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार १०० दशलक्षाहून अधिक यूजर्स त्यांचे पासवर्ड शेअर करत आहेत. त्यामुळे नवीन टीव्ही आणि चित्रपटांमध्ये गुंतवणूक करण्याच्या आमच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

पासवर्ड शेअरिंगसाठी अतिरिक्त शुल्कासह दोन पर्याय

जर नेटफ्लिक्स यूजर्सला त्याचा पासवर्ड एखाद्या बाहेरच्या व्यक्तीसोबत शेअर करायचा असेल तर त्याला ट्रान्सफर प्रोफाइल पर्याय वापरावा लागेल. असे केल्यावर तुमच्याकडून विहित रक्कम आकारली जाईल. त्याच वेळी, बाय फॉर एक्स्ट्रा मेंबरच्या पर्यायाद्वारे यूजर्स त्यांच्या नेटफ्लिक्स खात्याचा पासवर्ड ओळखीच्या नसलेल्या व्यक्तीला देऊ शकतील. मात्र त्यासाठी ठराविक रक्कम भरावी लागेल.

Whats_app_banner