Volvo XC40 Recharge: व्होल्वो कार इंडियाची इलेक्ट्रिक एसयूव्ही एक्ससी ४० रिचार्जचे नवीन एंट्री लेव्हल व्हेरियंट लॉन्च झाले आहे. केले आहे. सिंगल नावाच्या या नव्या व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ५४.९५ लाख रुपये ठेवण्यात आली. इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या टॉप व्हेरियंटसोबत याची विक्री केली जाणार आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत ५७.९० लाख रुपये आहे. एक्ससी ४० रिचार्जचे नवीन व्हेरियंट सिंगल मोटरसह येईल म्हणून या मॉडेलला सिंगल हे नाव देण्यात आले. एक्ससी ४० रिचार्ज सिंगल व्हेरिएंटचे बुकिंग आधीच सुरू करण्यात आले. स्वीडिश ऑटो जायंटच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन बुकिंग केले जाऊ शकते.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एक्ससी ४० रिचार्ज सिंगल डब्ल्यूएलटीपीनुसार ४७५ किलोमीटरची रेंज देते, जे आयसीएटी चाचणीनुसार ५९२ किमी आहे. इलेक्ट्रिक एसयूव्ही २३८ एचपी पॉवर आणि ४२० एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. एक्ससी ४० रिचार्ज केवळ ७.३ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेगाने धावू शकते. इलेक्ट्रिक एसयूव्हीचा टॉप स्पीड १८० किमी प्रतितास इतका मर्यादित आहे.
व्होल्वो एक्ससी ४० रिचार्ज सिंगल ६९ किलोवॅट बॅटरी पॅकसह सुसज्ज असेल. सुमारे ५०० किलो वजनाच्या बॅटरीवर व्होल्वो आठ वर्षांची किंवा १.६० लाख किलोमीटरची वॉरंटी देईल. व्होल्वो ग्राहकांना एक्ससी ४० रिचार्ज सिंगल एसयूव्हीसह ११ किलोवॅटवॉल बॉक्स चार्जर देखील ऑफर करेल.
लक्झरी ईव्ही सेगमेंटमध्ये नुकत्याच मिळालेल्या यशाची चव चाखल्यानंतर व्होल्वोने एक्ससी ४० रिचार्ज इलेक्ट्रिक एसयूव्हीचे नवे व्हेरिएंट आणण्याचा निर्णय घेतला. इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या नवीन व्हेरियंटच्या माध्यमातून आपली विक्री आणखी वाढवण्याची अपेक्षा आहे.
व्होल्वोच्या एक्ससी ४० रिचार्ज आणि सी ४० रिचार्ज इलेक्ट्रिक एसयूव्हीचा गेल्या वर्षी कंपनीच्या एकूण विक्रीत सुमारे २८ टक्के वाटा होता. गेल्या वर्षी व्होल्वोच्या एक्ससी ४० रिचार्जच्या ५१० युनिटची विक्री झाली. सप्टेंबर २०२३ मध्ये लॉन्च झालेल्या सी ४० रिचार्जची ही काही महिन्यांतच १८० युनिट्सची विक्री झाली. व्होल्वोने एक्ससी ४० रिचार्ज इलेक्ट्रिक एसयूव्ही २०२२ मध्ये भारतात सादर केली होती. याशिवाय, व्होल्वोचा भारतातील दुसरा ईव्ही म्हणून सी ४० रिचार्ज देखील आहे.
संबंधित बातम्या