एमजी मोटर इंडियाने झेडएस ईव्हीवर नवीन एक्साइट प्रो व्हेरिएंट लाँच केला आहे, ज्यात ग्राहकांना कमी किंमतीत अधिक फीचर्स मिळत आहेत. एमजी झेडएस ईव्ही एक्साइट प्रोची किंमत १९.९८ लाख रुपये आहे. जी बेस एक्झिक्युटिव्ह व्हेरिएंटपेक्षा सुमारे एक लाख रुपये जास्त आहे. एक्सक्लूसिव्ह प्लस आणि एसेन्स व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे २३.९८ लाख रुपये आणि २४.९८ लाख रुपये आहे.
नवीन एमजी झेडएस ईव्ही एक्साइट प्रो इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये ड्युअल-पॅन पॅनोरॅमिक सनरूफ मिळते. २० लाखांपेक्षा कमी किंमतीत हे फीचर्स देणारी इलेक्ट्रीक कार ठरली आहे. यात ७५ पेक्षा जास्त कनेक्टेड वैशिष्ट्ये तसेच अतिरिक्त सुरक्षिततेसाठी लेव्हल २ एडीएएसचा समावेश आहे. मॉडेलमध्ये सेगमेंट-फर्स्ट डिजिटल की देखील आहे, जी मालकाला फिजिकल की न वापरता कार स्टार्ट करण्यास अनुमती देते.
हार्डवेअर नवीन झेडएस ईव्ही एक्साइट प्रोमध्ये ५०.३ केडब्ल्यूएच बॅटरी पॅकमधून पॉवरसह देण्यात आले. कार कार सिंगल चार्जवर ४६१ किमी रेंजचा दावा करते. तर, इलेक्ट्रिक मोटर फ्रंट एक्सलवर १७४ बीएचपीची रेंज विकसित करते. टॉप व्हेरियंटमध्ये ३६० डिग्री कॅमेरा, १०.१ इंचाचा टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, ७ इंचाचा डिजिटल कंसोल आणि बरेच काही आहे. या मॉडेलमध्ये सहा एअरबॅग, ईबीडीसह एबीएस, ईएससी, हिल डिसेंट कंट्रोल आणि बरेच काही देण्यात आले आहे.
एमजी झेडएस ईव्ही या सेगमेंटमध्ये टाटा नेक्सॉन ईव्ही आणि महिंद्रा एक्सयूव्ही ४०० ला टक्कर देते आणि दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्हीला अलीकडच्या काळात महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळाले आहेत. लेटेस्ट अपडेटमध्ये झेडएस ईव्हीला स्पर्धेशी जुळवून घ्यावे, ग्राहकांना चांगले मूल्य द्यावे.
संबंधित बातम्या