मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Ratan Tata Birthday : ‘टाटा’ नावाचं इन्स्टिट्यूट… जाणून घ्या रतन टाटा यांचा प्रेरक प्रवास

Ratan Tata Birthday : ‘टाटा’ नावाचं इन्स्टिट्यूट… जाणून घ्या रतन टाटा यांचा प्रेरक प्रवास

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 28, 2022 06:17 PM IST

Ratan Tata Birthday : उद्योगपती आणि टाटा सन्सचे एमेरिट्स अध्यक्ष रतन टाटांचा आज ८५ वा वाढदिवस. एक बिझनेस टायकून असलेल्या रतन टाटा यांच व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रेरणादायी आहे. व्यावसायिकतेची नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना ते सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळतात, इतरांना मदत करण्यासाठी ते कायम सज्ज असतात.

Ratan Tata_HT
Ratan Tata_HT

Ratan Tata 85th Birthday : उद्योगपती आणि टाटा सन्सचे एमेरिट्स अध्यक्ष रतन टाटांचा आज ८५ वा वाढदिवस. एक बिझनेस टायकून असलेल्या रतन टाटा यांच व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रेरणादायी आहे. व्यावसायिकतेची नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना ते सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळतात, इतरांना मदत करण्यासाठी ते कायम सज्ज असतात.

ट्रेंडिंग न्यूज

मानवतेच्या पथावर त्यांनी आजपर्यंत आपल्या जीवनाचा प्रवास सुरु ठेवला आहे. त्यामुळेच त्यांनी संपत्तीचा बराचसा हिस्सा हा समाजासाठी खर्च केला आहे. केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय भारतीय उद्योगपती

वेल्थ हूरुन इंडिया रिच लिस्ट २०२२२ नुसार, रतन टाटा सोशल मिडियावर अधिक फाॅलो केले जाणाऱ्या उद्योगपतींच्या यादीत आहेत. यावर्षी त्यांच्या ट्विटर फाॅलोअर्समध्ये अंदाजे १८ लाखांची वाढ झाली आहे. आपली कार्यनिती, वक्तशीरपणा यांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे नाव देशातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत येत नाही.

टाटा सन्सचे नेटवर्थ ३८०० कोटी रुपये

रतन टाटांच्या ३८०० कोटी रुपयांच्या नेटवर्थचा बराचसा हिस्सा हा टाटा सन्सचा आहे. आयआयएफएल वेल्थ हूरुन इंडिया रिच लिस्ट २०२२ नुसार, रतन टाटा ४२१ वे श्रीमंत भारतीय आहेत. त्यांना ४३३ वे स्थान देण्यात आले होते. आणि २०२१ मध्ये त्यांची संपत्ती ३५०० कोटी रुपये होती.टाटा सन्स ही प्राथमिक निवेश होल्डिंग कंपनी आहे आणि टाटा एंटरप्राईजेसची प्रायोजक आहे. टाटा सन्सच्या इक्विटीतील ६० टक्के हिस्सा हा परोपकारी ट्रस्ट, कला, आरोग्य, शिक्षा या क्षेत्रांसाठी खर्च केला जातो.

टाटा समूहाचा वटवृक्ष

टाटा समूह आयटीपासून मीठापर्यंतच्या उद्योगात सहभागी आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, ३१ मार्च २०२२ पर्यंत ३११ अब्ज डाॅलर्सचे बाजारमूल्य असलेल्या २९ सार्वजनिक रुपात व्यवसाय करणारी टाटा कंपनी होती. रतन टाटांचे पणजोबा जमशेदजी टाटा यांनी सुरु केलेल्या व्यवसायाला रतन टाटांनी न्याय दिला. २०२१-२२ मध्ये सर्व टाटा समुहातील सर्व कंपन्यांचा महसूल १२८ अब्ज डाॅलर्स असून येथे अंदाजे ९,३५,००० पेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत टीसीएस ही सर्वात चांगली कंपनी मानली जाते.

सर्वसामान्यांच्या लाखभरात गाडी घेण्याची स्वप्नपूर्ती

सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांनाही आपल्या घरात गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रतन टाटांनी २००८ मध्ये नॅनो आणली. एक लाख रुपयांत मिळणारी नॅनो ही सर्वात स्वस्त गाडी ठरली. २००९ मध्ये नॅनो रस्त्यावर धावू लागली. पण बीएस ४ मापदंड आल्यानंतर कंपनीने नॅनोचे उत्पादन बंद केले.

स्टार्टअप्सला पाठबळ

नवउद्योजकांना पाठबळ देण्यासाठी रतन टाटा अनेक स्टार्टअप्सनाही वेळोवेळी मदत करत असतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग