मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SAP layoff : IBM नंतर 'सॅप'मध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात, कंपनीने दिले ‘हे’ कारण

SAP layoff : IBM नंतर 'सॅप'मध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात, कंपनीने दिले ‘हे’ कारण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2023 10:10 AM IST

SAP to layoff 3000 workers : सॉफ्टवेअर कंपनी सॅप कंपनीतील जवळपास ३ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.

SAP layoff
SAP layoff

सॉफ्टवेअर कंपनी आयबीएमने जवळपास चार हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी केली असताना आता जर्मनीची सॉफ्टवेअर कंपनी SAP नेही आज कंपनीतील तीन हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. SAP ही कंपनी वाल्डोर्फ समुहातील कंपनी आहे. ही कंपनी सॉफ्टवेअर आणि क्लाऊड आधारित कॉम्प्युटर सेवा पुरवणारी कंपनी आहे. कंपनीने ले ऑफचे कारण देताना म्हटले आहे की, आपल्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आम्ही टारगेटेड रिस्ट्रक्चरींगची योजना आखली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

आयबीएम जवळपास ४००० नोकऱ्या कमी करणार आहे. जे आयटी कंपन्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या एक टक्क्यांहून अधिक आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

त्याचप्रमाणे सॅप  कंपनीने २०२२ या वर्षाचा एक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये हे नमूद करण्यात आलं आहे की SAP च्या अडीच टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते. जगभरात SAP कंपनीत जवळपास एक लाख २० हजार कर्मचारी नोकरी करत आहेत. या सगळ्या संख्येची अडीच टक्के गृहीत धरली तर कंपनी साधारण ३ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.

जगभरात आर्थिक मंदीची चाहूल लागली आहे. ट्विटर, गुगल, मायक्रोसॉफ्ट व अमेझॉन कंपनीने कर्मचारी कपात केली आहे. 

WhatsApp channel

विभाग