Antique Chair : जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना जुन्या वस्तू गोळा करण्याची आवड असते, अशा प्रकारे होणाऱ्या लिलावात ते सहभागी होत असतात. मिडिया रिपोर्टनुसार अशीच एक ऐतिहासिक खुर्ची तब्बल ८२ लाखाला विकली आहे. ज्या व्यक्तीने ती खरेदी केली होती, तेंव्हा ती फक्त ४ हजार रुपयांमध्ये खरेदी केली होती.
अमेरिकन टिकटाॅकर जस्टिन मिलरला फेसबुक मार्केटप्लेसवर जुनी खुर्ची दिसली होती. त्याने ती केवळ ४ हजारात खरेदी केली. काही दिवसाने त्याने ती आॅक्शनमध्ये विकली तेंव्हा त्याला खरेदी किंमतीच्या २००० पट नफा झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जस्टिन मिलरला जुन्या गोष्टींची खूप आवड आहे. म्हणूनच जेव्हा त्याने फेसबुक मार्केटप्लेसवर खुर्ची पाहिली तेव्हा त्याला हे विशेष वाटले. म्हणून त्याने ती खुर्ची विकत घेतली. मिलर तेवढ्यावर थांबला नाही. त्याने गुगलवर सर्च केले तेव्हा त्यांना आढळले की काही दिवसांपूर्वी अशीच एक खुर्ची सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांना विकली गेली होती. त्यांनी ही खुर्ची दुरुस्त करून घेतली. तेव्हा ही खुर्ची दुरुस्त करण्यासाठी त्याला सुमारे अडीच लाख रुपये खर्च आला. त्यानंतर मिलरने लिलावासाठी सोथबीज या फाइन आर्ट कंपनीशी संपर्क साधला. सोथबीचा अंदाज लावला की, ही खुर्ची सुमारे २५ लाख ते ३० लाख रुपयांना विकली जाऊ शकते.
मात्र, या खुर्चीचा लिलाव सुरू झाल्यावर जवळपास सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याचा लिलाव सुमारे २८ हजार डाॅलर्स पासून सुरू झाला. वाढत्या आॅक्शनच्या किंमतींच्या स्पर्धेत हा लिलाव सुमारे 85 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 70 लाख रुपयांपर्यंत पोहोचला. त्यात लिलाव शुल्क जोडल्यानंतर, त्याची एकूण किंमत $1 लाख म्हणजेच सुमारे 82 लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. अशा प्रकारे या मिलरने 4 हजार रुपयांच्या खुर्चीतून 82 लाख रुपये कमावले.