मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Group : हिंडनबर्गच्या अहवालानं अदानीच्या या शेअरची 'पावर'च संपवली! काय हाल झाले बघा!

Adani Group : हिंडनबर्गच्या अहवालानं अदानीच्या या शेअरची 'पावर'च संपवली! काय हाल झाले बघा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 07, 2023 11:27 AM IST

Adani Power Stock Price : हिंडनबर्ग रिसर्च संस्थेच्या नकारात्मक अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्सना मोठा फटका बसला आहे. अदानी पावरचं सर्वाधिक नुकसान झालं आहे.

Gautam Adani
Gautam Adani

Adani Power Stock : अमेरिका स्थित हिंडनबर्ग रिसर्च संस्थेनं केलेल्या अफरातफरी, फसवणूक व मनी लाँड्रिंगच्या आरोपांनंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सना लागलेली घरघर सुरूच आहे. समूहातील काही कंपन्यांना तर याचा मोठा फटका बसला आहे. अदानी पावरचे शेअर सर्वाधिक ३४ टक्क्यांनी घसरले आहेत. मागील महिन्यात २४ तारखेला २७४ वर असलेला हा शेअर आजघडीला १८२ पर्यंत खाली आला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारही धास्तावले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अदानी पॉवरचा शेअर २०२२ च्या टॉप मल्टीबॅगर्सपैकी एक आहे. मागील वर्षी या शेअरच्या भावामध्ये २०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. तथापि, या वर्षी हा शेअर ३९.०६ टक्क्यांनी घसरला आहे.

काल, ६ फेब्रुवारी रोजी, आठवड्याच्या पहिली दिवशी दुपारपर्यंत अदानी पावरच्या समभागाला लोअर सर्किट लागले. कंपनीचे बाजार भांडवल ७०,३६९ कोटींपर्यंत खाली घसरले. अदानी पॉवरचा शेअर मूव्हिंग अॅव्हरेजच्या खाली ट्रेडिंग करत आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ?

Tips2trade च्या अभ्यासानुसार, अदानी पॉवरचा शेअर २१२ पर्यंत जाऊ शकतो. आताच्या परिस्थितीत गुंतवणूकदार काही प्रमाणात यात जोखीम घेऊ शकतात.

‘गेल्या ५ महिन्यांत स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या दोन ते तीन आठवड्यांत विक्रीचा दबाव वाढला आहे. चार्ट पॅटर्न अस्थिरता दाखवू शकतो. मात्र, अदानीचा हा शेअर सध्या सर्वात स्वस्त समभागांपैकी एक आहे. आताची अस्थिरता ही प्रासंगिक आहे. त्यामुळं गुंतवणूकदार त्यांच्या स्वत: च्या जोखमीवर निर्णय घेऊ शकतात,’ असं प्रभुदास लिलाधर यांनी सांगितलं.

रेलिगेअर ब्रोकिंगच्या सल्ल्यानुसार, ‘विक्रीच्या जोरदार लाटेनंतर अदानी समूहाच्या निवडक शेअर्समध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून येत आहे. वातावरण स्थिर होईपर्यंत नवीन जोखीम टाळणं शहाणपणाचे आहे. अदानी पॉवरसाठी परिस्थिती अजूनही नकारात्मक आहे, त्यामुळं गुंतवणूकदारांनी कोणतीही पूझीशन घेणं टाळावं.’

एंजल वनचे हेड अॅडव्हायझरी अमर देव सिंग म्हणाले, ‘हिंडनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. त्यामुळं हे शेअर्स पुन्हा मजबूत होईपर्यंत गुंतवणूकदारांनी दूर राहावं.’

WhatsApp channel