मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 10 May 2024 : अक्षय तृतीयेदिवशी कुणाचे नशीब सोन्यासारखे झळाळणार? वाचा आजचे राशीभविष्य

Today Horoscope 10 May 2024 : अक्षय तृतीयेदिवशी कुणाचे नशीब सोन्यासारखे झळाळणार? वाचा आजचे राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 10, 2024 08:47 AM IST

Today Horoscope 10 May 2024 : आज १० मे २०२४ शुक्रवार रोजी, अतिगंड योग असून, चंद्र आज वृषभ राशीतून संक्रमण करणार आहे. ग्रह-नक्षत्राच्या या बदलामुळे १२ राशींवर काय परिणाम होईल? वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य १० मे २०२४
राशीभविष्य १० मे २०२४ (Freepik)

आज शुक्रवार १० मे रोजी, वैशाख तृतीया असून, आज साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवसाला आपण अक्षय तृतीया म्हणून संबोधतो. रोहिणी नक्षत्र आणि अतिगंड योग आहे. आज चंद्र वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. तैतिल करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

मेष

आज शुक्रवार १० मे चा दिवस मेष राशीसाठी उत्तम असणार आहे. आज चंद्रभ्रमण आपणास भाग्यकारक अनुभव देणारा आहे. तुम्हाला प्रेरणा देणारे लोक भेटतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्याल. कलाकारांना अनेक संधी उपलब्ध होतील. परदेशगमनाचे योग संभवतात. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी गुंतवणूक करण्यास दिवस उत्तम आहे.

वृषभ

आज वृषभ राशीसाठी संमिश्र दिवस असणार आहे. अतिगंड योगात विद्यार्थ्यांनी इतर ठिकाणी जास्त लक्ष न देता अभ्यास करावा. काम आणि दाम यांचे गणित जमवता जमवता वैयक्तिक जीवनात त्याचे पडसाद खोलवर उमटतील. एखादा निर्णय तडका फडकी घेण्यापासून सावध राहा. प्रवास करताना वाहने जपून चालवा. जुनी दुखणी त्रास देण्याची शक्यता आहे. राजकारणी लोकांना जनतेचा रोष पत्करावा लागेल.

मिथुन

मिथुन राशीसाठी आजचे चंद्रभ्रमण पाहता मुलांच्या प्रगतीची चिंता वाटेल. पूर्वी केलेल्या कामाची लोकांकडून स्तुती होईल . समाजात मानसन्मान मिळेल. जुने मित्र भेटतील. आर्थिक पातळीवरील प्रश्न चुटकीसरशी सोडवाल. तरुणांना योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाल्यामुळे स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. स्वतःसाठी चोखंदळपणे खरेदी कराल. काही महत्त्वाचे निर्णय अविचारपणे घेतले जाण्याची शक्यता आहे. इतरांशी सल्लामसलत करून निर्णय घ्यावेत.

कर्क

आज रोहिणी नक्षत्रातून चंद्राचे संक्रमण होणार आहे.कर्क राशीसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असेल. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. त्यामध्ये चैनीच्या वस्तूंचा जास्त समावेश असेल. जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही आणि आनंदी वातावरण निर्माण होईल.

सिंह 

सिंह राशीसाठी आज शुक्रवारचा दिवस उत्तम असणार आहे. आज चंद्राच्या शुभ नक्षत्रातील भ्रमणात तुमच्या नवीन योजनांचे व्यवसायात स्वागत होईल. त्यामुळे आपोआप प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळेल. पूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक गोष्टींचे लाभ आता मिळणार आहेत. तुमच्या व्यक्तीमत्त्वात सुधारणा होईल. त्याबरोबरच उत्तम वक्तृत्वाची साथ जर व्यवहारात दिलीत तर फायदा होईल.

कन्या

आज चंद्र केतुशी संयोग करीत असून हक्काच्या वस्तूंबांबत तुमचे विचार स्वच्छ आणि स्पष्ट राहतील. नोकरी व्यवसायात अडलेली कामे पार पडतील. योग्य वेळी समयसूचकता दाखवाल. हजरजबाबीपणामुळे वरिष्ठांची मने जिंकून घ्याल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे हिताचे ठरेल. व्यवहारात कोणाशी संगनमत करायचे हे ठरवून आपल्या फायद्याच्या गोष्टी ओळखाल.

तूळ

आज चंद्र-केतू योगात आर्थिक बाबतीत पैसा मिळण्याचे अनेक नवे मार्ग खुले होतील. परंतु खर्चही तितकाच वाढल्यामुळे हातात पैसा मात्र रहाणार नाही. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. तुमच्यातील कलाकारवृत्तीला चालना मिळेल. घरामध्ये बुद्धी आणि व्यवहार यांची सांगड योग्य तऱ्हेने घालावी लागेल.

वृश्चिक

आज बुध ग्रहाचे राशीपरिवर्तन पाहता काही लाभदायक आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. अनेक दिवसांपासून रखडलेली जुनी येणी वसूल होतील. त्यासाठी मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये कामाचा ताण वाढला तरी त्यातील शॉर्टकट शोधून काम सोपे कराल. घरातील रेंगाळलेल्या कामांकडे लक्ष द्याल. घरातील प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी वातावरण लाभेल. आपल्या स्वभावातील दूरदर्शीपणामुळे कठीण परिस्थिती यशस्वीरित्या हाताळाल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आज अतिगंड योगात दिवस अत्यंत शुभ असणार आहे. लेखक-पत्रकारांना चांगले ग्रहमान आहे. मित्रांच्या गोतावळ्यात जास्तीत जास्त रहाण्याचा योग आहे. नोकरी व्यवसायात आपण करीत असलेल्या कामाची चांगल्या पद्धतीने तपासणी करा. सूचक स्वप्ने पडतील. ,मानसन्मान आणि अधिकाराचे योग संभवतात. अनेक गोष्टी बौद्धीक निकषावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

मकर

मकर राशीसाठी आज चंद्रबल अनुकूल आहे.त्यामुळे दिवसही चांगला असणार आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे आर्थिक लाभ चांगले होतील. अडथळ्याच्या मार्गाने का होईना पण पैशाच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील. घरातील हलक्या फुलक्या वातावरणामुळे सुखावून जाल. करियरमध्ये एखादा दृढनिश्चय कराल. स्वतंत्रपणे कार्य करण्यात धन्यता मानाल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ताणतणावाचा असणार आहे. आज प्रतिकूल चंद्रभ्रमणात भावनांची थोडीशी ओढाताण झाल्यामुळे मनाला ताण जाणवेल. संततीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. मुलांच्या मार्गदर्शनासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. स्पर्धा परीक्षांसाठी भरपूर कष्ट करावे लागतील. व्यसनांपासून सावध राहा नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. प्रवासामध्ये आपल्या चीजवस्तूंची काळजी घ्या.

मीन

मीन राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आज अनिष्ट चंद्रभ्रमणात एखादा निर्णय घेताना स्वतःच संभ्रमात पडाल. नको त्या गोष्टींबाबत चिंता करत बसाल. आणि हातात मात्र काहीच पडणार नाही. करियरमध्ये परदेशी कंपन्यांशी संबंध येईल. रेंगाळलेल्या सरकारी कामांमध्ये स्वतःहून लक्ष घालाल. यंत्रावर काम करणाऱ्यांनी अवश्य काळजी घ्यावी. खूप काम करावेसे वाटले तरी, प्रकृती थोडी नरमगरम राहिल्यामुळे उत्साह वाटणार नाही.

WhatsApp channel