मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac signs this week : चालू आठवड्यात ‘या’ तीन राशींना शुक्र देणार धनलाभ आणि ऐश्वर्य

Lucky Zodiac signs this week : चालू आठवड्यात ‘या’ तीन राशींना शुक्र देणार धनलाभ आणि ऐश्वर्य

HT Marathi Desk HT Marathi
May 01, 2023 10:10 AM IST

Lucky Zodiac signs 1 May to 7 May : चालू आठवडा तीन राशींसाठी नशिबाची दारं उघडणारा ठरणार आहे.

Lucky Zodiac Signs
Lucky Zodiac Signs

मिथुन : सप्ताहात शुक्र आपणास आकस्मिक धनलाभ मिळवून देईल. आपणास मोठे आर्थिक लाभ घडविणारे योग आहेत. स्वतःला सिद्ध कराल. आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. लाभ स्थानातील चंद्रगोचर आणि शुभ योगात वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुटुंबातील वरिष्ठ मंडळी सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. खासगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. रविबल उत्तम लाभल्याने विवाह इच्छुकांचे खात्रीशीर विवाहाचे योग आहेत. विद्याभ्यासात प्रगती कराल. कलाक्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. शुभवार्ता ऐकायला मिळतील. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. सुख मिळेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातुन धनप्राप्ती होईल. स्पर्धापरिक्षेत यश लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. व्यवसायात नवीन प्रकल्प आरंभ कराल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. प्रवास आनंददायक होतील.

चंद्रबल शुभ तारीखः ०२,०४,०६,०७.

कन्या : सप्ताहात अत्यंत शुभ स्थानातुन शुक्र सुख आणि विद्वत्तेत वाढ करेल . मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. मनोबल कमालीचे उंचावलेल असेल. व्यवसाय कलाक्षेत्रातील व्यक्तींना स्वकर्तुत्व सिद्ध करण्यास वाव राहील. तुमची पदोन्नती आणि प्रगती होईल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक काळ आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. प्रेमप्रकरणात यश येईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. धाडसी निर्णय घ्याल. आपल्या भूमिकेला वरिष्ठांकडून पसंती मिळेल. शासकीय कामकाजात यश येईल. राजाश्रय लोभल. राजदप्तरी मान सन्मान होईल. व्यवसाय रोजगारात उच्च ज्ञान किंवा नवे तंत्रज्ञान अंत्यत फायदेशीर ठरेल. महिला वर्गाना विशेष प्रगतीचा टप्पा गाठता येईल. अनुकूल परिस्थिती निर्माण करेल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल. अनुकुल वातावरण असणार आहे. मनशांती लाभेल. वाहन,घर खरेदीचा योग आहे. स्थावर मालमत्तेत वाढ होईल.

चंद्रबल शुभ तारीखः ०१,०३,०५,०७.

मकर : सप्ताहात शुक्र भाग्यस्थानातून भ्रमण करत असताना भाग्यदायक घटना अनुभवास येतील. परदेशात भ्रमणाचे योग आहेत. देवदर्शनासाठी प्रवास होईल. आध्यात्मिक अनुभुती घ्याल. नोकरीत नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल.भागीदाराकडून सहकार्य लाभेल. आपणास मुशाफिरीत लाभ होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहिल. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. लाभ स्थानातील ग्रहयोगामुळे नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठया अधिकाराची नोकरी मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. उद्योगात लाभ होईल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. आपण सार्वजनिक चळवळीत आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. सामाजिक राजकारणी लोकांना लोकप्रियता मिळेल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान प्राप्त होईल.

चंद्रबल शुभ तारीखः ०३,०५,०६ ,०७.

 

जय अर्जुन घोडके

jaynews21@gmail.com

(लेखक ज्योतिष विद्येचे अभ्यासक आहेत.)

 

WhatsApp channel