मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Palmistry : तुमच्या तळहातावर या खुणा आहेत का?, अशुभ मानल्या जातात तळहातावरील 'या' गोष्टी

Palmistry : तुमच्या तळहातावर या खुणा आहेत का?, अशुभ मानल्या जातात तळहातावरील 'या' गोष्टी

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Dec 20, 2022 11:05 AM IST

Do You Have These Signs On Your Palm : हस्तरेषा शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या तळहातावर अशुभ चिन्ह किंवा रेषा असतात, त्यांना कठोर परिश्रम करूनही जीवनात यश मिळत नाही.

काय सांगतात तुमच्या हातवरच्या रेषा
काय सांगतात तुमच्या हातवरच्या रेषा (हिंदुस्तान टाइम्स)

हस्तरेषा शास्त्रानुसार तळहातावर अनेक शुभ आणि अशुभ चिन्ह, रेषा आणि आकार असतात. प्रत्येकाच्या तळहातावर अशा काही खुणा आणि रेषा असतात, ज्या खूप शुभ मानल्या जातात. त्याचबरोबर काही असे चिन्ह असतात जी शुभ मानली जात नाहीत. हस्तरेषा शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीच्या तळहातावर अशुभ चिन्ह किंवा रेषा असतात, त्यांना कठोर परिश्रम करूनही जीवनात यश मिळत नाही.सर्व प्रयत्नांनंतरही असे लोक जीवनात नेहमीच अयशस्वी राहतात. अशा रेषा आणि खुणा एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील त्रास दर्शवतात. चला आज जाणून घेऊया अशुभ दर्शवणाऱ्या रेषा आणि चिन्हांबद्दल.

तळ हातावर ब्लॅक स्पॉट

ज्या लोकांच्या तळहातावर काळे डाग असतात त्यांनाही शुभ मानले जात नाही. हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या लोकांच्या तळहातावर काळे डाग असतात त्यांना अशुभाचा सामना करावा लागतो. आयुष्यभर एकामागून एक समस्या येत असतात.

अनामिकेवर आडव्या रेषा

अनामिका वर आडव्या रेषा दुर्दैव सूचित करतात. असे मानले जाते की ज्या लोकांच्या तळहातावर अनामिकेवर आडव्या रेषा असतात, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा प्रभावित होते.

भाग्य रेषेवर तीळ असणे

हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या लोकांच्या तळहातावर भाग्य रेषेवर तीळ असते ते देखील अशुभ मानले जाते. असे म्हणतात की अशा लोकांच्या आयुष्यात मोठ्या अडचणी येतात आणि त्यांना करिअर आणि आर्थिक अशा दोन्ही समस्यांना सामोरे जावे लागते.

जीवनरेषेला छेदणाऱ्या रेषा

अनेकदा लोकांच्या तळहातावर अनेक छोट्या रेषा नशिबाची रेषा कापताना दिसतात. हस्तरेषा शास्त्रानुसार या रेषा शुभ मानल्या जात नाहीत. ज्या ठिकाणी या रेषा जीवनरेषेला छेदतात, त्या व्यक्तीला त्या वयात समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच, रेषा अशुभाचे सूचक मानल्या जातात.

तळहातावर बेट

तळहातावर कोणत्याही ठिकाणी बेटाचे चिन्ह असणे शुभ मानले जात नाही. हस्तरेषाशास्त्रानुसार तळहातातील बेटाचे चिन्ह कोणत्याही पर्वतावर असले तरी त्याचा विपरीत परिणाम होतो. गुरु पर्वतावर बेटाची खूण असेल तर मान कमी होतो. सूर्य पर्वतावर बेट चिन्ह असल्यास नोकरीशी संबंधित अडचणी येतात. तसेच, चंद्राच्या पर्वतावर एखाद्या बेटाचे चिन्ह असल्यास, व्यक्तीच्या कल्पनाशक्तीवर परिणाम होतो. दुसरीकडे, मंगळाच्या पर्वतावर बेटाचे चिन्ह असल्यास त्या व्यक्तीचे धैर्य कमी होते.

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग