Dhanu Makar Kumbh Meen Rashi Bhavishya : आज चंद्र शनिच्या नक्षत्रातुन भ्रमण करणार असून, वरियान योग आणि वणिज करणात धनु, मकर, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस! वाचा राशीभविष्य!
आज सरस्वती योगात दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल. त्यामुळे दुसऱ्याना आदर वाटेल. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मना सारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. कौटुंबिक सुखशांती आनंद दायक वातावरण राहिल. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल. राजकारणातील व्यक्तींना पदप्राप्ती आणि प्रतिष्ठा लाभेल.
शुभरंग: पिवळा, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०५.
आज चंद्र राहु योगात खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. रोजगारात मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कामाबाबत विसंबून राहु नका. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहिल. आंनदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
शुभरंग: जांभळा, शुभदिशा: नैऋत्य, शुभअंकः ०५, ०८.
आज चंद्र मंगळ योगात स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात कामगारांना कितीही सवलती दिल्या तरी त्यांच्या त्रासापासून सुटका मिळणार नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मनातील काहीही हातचे राखून न ठेवता मोकळ्या निर्भिड स्वभावाबद्दल तुम्ही प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाच्या क्षेत्रात करियर करणारांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल.
शुभरंग: निळा, शुभदिशा: पश्चिम, शुभअंकः ०२, ०८.
आज ग्रहयोग पाहता वडिलोपार्जित इस्टेटीचे वाद चिघळतील. नोकरी धंद्याच्या ठिकाणच्या आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. खूप दिवसां पासून अडलेली ऑर्डर हातात पडेल. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल. संवाद वाढेल. आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. मनात उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. रोजगारात आर्थिक लाभ होईल. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामजस्य राहील. व्यापारात वाढ होवुन अनुकुल स्थिती राहणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोना तून कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग आहे. वडिलांच्या सहकार्याने व्यवसायातील अडचणी दुर होतील.
शुभरंग: पिवळसर, शुभदिशा: ईशान्य, शुभअंकः ०३, ०९.
संबंधित बातम्या