मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Devendra Fadnavis : राज्य सरकारच्या भवितव्याविषयी बोलताना फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Devendra Fadnavis : राज्य सरकारच्या भवितव्याविषयी बोलताना फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Dec 17, 2022, 07:03 PMIST

Devendra Fadnavis on Eknath Shinde : राज्यातील शिंदे-फडणवीसांचं सरकार टिकणार नाही, हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खोडून काढला. 'ज्यांना स्वत:चं सरकार टिकवता आलं नाही, त्यांच्या नाकाखाली आम्ही त्यांचं सरकार घेऊन गेलो आणि आमचं सरकार स्थापन केलं. आता ते कशाच्या जोरावर वल्गना करत आहेत? हे सरकार टिकणार, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही निवडणूक लढणार आणि पुन्हा आमचंच सरकार महाराष्ट्रात येणार', असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.