मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  maharashtra tableau Video : शक्ती-भक्तीचा अनोखा संगम; महाराष्ट्राच्या चित्ररथानं जिंकली मनं

maharashtra tableau Video : शक्ती-भक्तीचा अनोखा संगम; महाराष्ट्राच्या चित्ररथानं जिंकली मनं

Jan 26, 2023, 08:09 PMIST

maharashtra tableau Video : देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर आज पार पडला. भारतीय लष्कराच्या सामार्थ्याचं दर्शन या निमित्तानं जगाला घडलं. त्याचबरोबर, देशातील विविध राज्यांच्या रंगबिरंगी चित्ररथांनी देशातील विविधतेचं व सांस्कृतिक वैभवाचंही दर्शन घडवलं. महाराष्ट्राच्या वतीनं यंदा ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्ती’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ संचलनात सहभागी झाला होता. हा चित्ररथ उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.