मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : भारतीय तटरक्षक दलानं असं शोधून काढलं खोल समुद्रातील ३२ किलो सोनं

Video : भारतीय तटरक्षक दलानं असं शोधून काढलं खोल समुद्रातील ३२ किलो सोनं

Jun 02, 2023, 06:08 PMIST

Indian Coast Guards : भारतीय तटरक्षक दलानं महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) आणि सीमाशुल्क विभागाच्या मदतीनं एक मोठी मोहीम फत्ते केली आहे. या पथकानं संयुक्त कारवाई करत सोने तस्करांनी समुद्रात फेकलेलं तब्बल ३२ किलो सोन्याचा साठा शोधून काढलं आहे. या सोन्याची किंमत तब्बल २० कोटी २० लाख रुपये असून या सोन्याची भारतातून श्रीलंकेत तस्करी केली जात होती.