मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Goshta Eka Paithanichi: 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमाचं सायली संजीवने केलं अनोखं प्रमोशन!

Goshta Eka Paithanichi: 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमाचं सायली संजीवने केलं अनोखं प्रमोशन!

Dec 05, 2022, 01:34 PMIST

  • भरजरी पैठणी… मराठमोळा साजश्रृंगार करून बाईकस्वारी करायला निघालेल्या महिलांनी शनिवारी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसर दुमदुमला होता. निमित्त होते ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाच्या प्रमोशनचे. या बाईक रॅलीमध्ये इतर महिलांसह सायली संजीवचाही सहभाग होता. एकंदरच हा परिसर उत्साहाने भरलेला होता. या रॅलीला सोहळ्याचे स्वरूप आले होते. या दरम्यान बाईकस्वार महिलांना पैठणीने गौरवण्यात आले. याव्यतिरिक्त खेळांचे आणि लकी ड्रॅाचे आयोजनही करण्यात आले होते. ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.