मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ICC Mens T20I Team : आयसीसीचा सर्वोत्तम T20 संघ जाहीर; ३ भारतीयांची निवड, ‘हा’ असेल कर्णधार

ICC Mens T20I Team : आयसीसीचा सर्वोत्तम T20 संघ जाहीर; ३ भारतीयांची निवड, ‘हा’ असेल कर्णधार

Jan 23, 2023, 03:41 PM IST

    • ICC Mens T20I Team of 2022 : ICC ने २०२२ चा सर्वोत्कृष्ट T20 संघ निवडला आहे. यामध्ये ३ भारतीयांना स्थान मिळवता आले. या संघात विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा जोस बटलर या संघाचा कर्णधार बनला आहे.
ICC Mens T20I Team of 2022

ICC Mens T20I Team of 2022 : ICC ने २०२२ चा सर्वोत्कृष्ट T20 संघ निवडला आहे. यामध्ये ३ भारतीयांना स्थान मिळवता आले. या संघात विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा जोस बटलर या संघाचा कर्णधार बनला आहे.

    • ICC Mens T20I Team of 2022 : ICC ने २०२२ चा सर्वोत्कृष्ट T20 संघ निवडला आहे. यामध्ये ३ भारतीयांना स्थान मिळवता आले. या संघात विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा जोस बटलर या संघाचा कर्णधार बनला आहे.

ICC Mens T20I Team of 2022 : ICC ने २०२२ साठी पुरुषांचा सर्वोत्तम T20 संघ जाहीर केला आहे. यामध्ये टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्याशिवाय अष्टपैलू हार्दिक पांड्यालाही वर्षातील T20 संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणाऱ्या जोस बटलरला आयसीसीच्या सर्वोत्तम टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला या संघात स्थान मिळालेले नाही. मोहम्मद रिझवान आणि हारिस रौफ हे पाकिस्तानचे दोन खेळाडू आहेत, ज्यांचा या संघात समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

भारताच्या सर्वाधिक ३ खेळाडूंना T20I टीम ऑफ द इयर २०२२ या संघात स्थान मिळाले आहे. यानंतर इंग्लंड-पाकिस्तानच्या २-२ खेळाडूंचा समावेश आहे. झिम्बाब्वे, न्यूझीलंड, आयर्लंड आणि श्रीलंकेचा प्रत्येकी एक खेळाडू या ११ जणांच्या यादीत आहे.

ICC पुरुष T20I टीम ऑफ द इयर: जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मोहम्मद रिझवान, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ग्लेन फिलिप्स, सिकंदर रझा, हार्दिक पंड्या, सॅम केरेन, वानिंदू हसरंगा, हरिस रौफ आणि जोश लिटल.

२०२२ हे वर्ष विराट कोहलीसाठी शानदार ठरलं

विराट कोहलीसाठी २०२२ हे वर्ष संस्मरणीय ठरले. आशिया कपमध्ये त्याने दमदार फलंदाजी केली होती. टी-२० फॉरमॅटमध्ये झालेल्या या स्पर्धेत कोहली सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. त्याने ५ सामन्यात २७६ धावा केल्या होत्या. त्याचवेळी त्याने अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकांचा दुष्काळ संपवला होता.

ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकातही कोहलीने आशिया कपचा फॉर्म कायम ठेवला. मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्याने ८२ धावांची नाबाद खेळी खेळली होती. याशिवाय त्याने या स्पर्धेत आणखी ३ अर्धशतके झळकावली होती. तो या स्पर्धेतील सर्वाधिक (२९६) धावा करणारा खेळाडू ठरला होता.

विराट व्यतिरिक्त सूर्यकुमार यादवसाठी २०२२ हे वर्ष छान होते. एका कॅलेंडर वर्षात १ हजार T20 धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला. २०२२ मध्ये तो ११६४ धावांसह T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. सूर्यकुमारने गेल्या वर्षी टी-२०मध्ये दोन शतके झळकावली होती. याशिवाय त्याच्या बॅटमधून ९ अर्धशतके झळकली.