मराठी बातम्या  /  क्रीडा  /  SL vs PAK T20: श्रीलंकेकडून पाकिस्तानचा ५ विकेट्सनी पराभव, रविवारी दोन्ही संघ फायनलमध्ये भिडणार

SL vs PAK T20: श्रीलंकेकडून पाकिस्तानचा ५ विकेट्सनी पराभव, रविवारी दोन्ही संघ फायनलमध्ये भिडणार

Sep 09, 2022, 10:58 PM IST

    • Sri Lanka Vs Pakistan Asia Cup 2022 Super 4: आशिया चषक सुपर फोरमधील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. सुपर फोरमधील हा शेवटचा सामना होता.
pathum nisanka

Sri Lanka Vs Pakistan Asia Cup 2022 Super 4: आशिया चषक सुपर फोरमधील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. सुपर फोरमधील हा शेवटचा सामना होता.

    • Sri Lanka Vs Pakistan Asia Cup 2022 Super 4: आशिया चषक सुपर फोरमधील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला आहे. सुपर फोरमधील हा शेवटचा सामना होता.

आशिया कप २०२२ फायनलच्या ड्रेस रिहर्सल सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला आहे. खरे तर हे दोन्ही संघ आधीच फायनलमध्ये पोहोचले आहेत. दोन्ही संघ ११ सप्टेंबरला फायनलमध्ये भिडणार आहेत. श्रीलंका पाच वेळा चॅम्पियन आहे, तर पाकिस्तानने दोनदा आशिया कप जिंकला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

तत्पूर्वी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेसमोर १२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रींलकेने १७ षटकातंच लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. श्रीलंकेकडून पथुम निसांकाने सर्वाधिक ५५ धावा केल्या. दोन्ही संघ आता ११ सप्टेंबरला फायनलमध्ये भिडणार आहेत.

पाकिस्तानचा डाव

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असणारा मोहम्मद रिझवान आज १४ चेंडूत १४ धावा करुन बाद झाला. त्यानंतर कर्णधार बाबर आझम २९ चेंडूत ३०, फखर जमान १८ चेंडूत १३, इफ्तिखार अहमद १७ चेंडूत १३, खुशदिल शाह ४ धावा करुन तंबूत परतले.

मात्र, त्यानंतर मोहम्मद नवाजने काही चांगले फटके मारले. त्याने १८ चेंडूत २६ धावांची खेळी करत पाकिस्तानला १२० चा टप्पा पार करुन दिला. १९ व्या षटकात नवाज धावबाद झाला.

तर सामन्यात श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांनी तीन बळी घेतले. त्याचवेळी फिरकीपटूंनी सहा विकेट्स घेतल्या. फिरकीपटू वानिंदू हसरंगाच्या खात्यात ३ बळी आले. त्याचवेळी महेश तीक्षनाने दोन गडी बाद केले. धनंजय डी सिल्वाला एक विकेट मिळाली. आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या प्रमोद मदुशानने दोन बळी घेतले.