मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sachin vs Virat : सचिन आणि विराट यांच्यात सर्वश्रेष्ट कोण? कमिन्सनं प्रश्न टाळला नाही, सरळ सांगितलं

Sachin vs Virat : सचिन आणि विराट यांच्यात सर्वश्रेष्ट कोण? कमिन्सनं प्रश्न टाळला नाही, सरळ सांगितलं

Jan 23, 2023, 12:25 PM IST

    • pat cummins on Sachin Vs Virat Who Is Better : भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. कोहलीने सुरुवातीच्या दोन सामन्यात ८ आणि ११ धावा केल्या. तिसरा सामना २५ जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे.
pat cummins on Sachin Vs Virat

pat cummins on Sachin Vs Virat Who Is Better : भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. कोहलीने सुरुवातीच्या दोन सामन्यात ८ आणि ११ धावा केल्या. तिसरा सामना २५ जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे.

    • pat cummins on Sachin Vs Virat Who Is Better : भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. कोहलीने सुरुवातीच्या दोन सामन्यात ८ आणि ११ धावा केल्या. तिसरा सामना २५ जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे.

विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आता तो मोठ्या खेळी खेळत आहे. गेल्या वर्षीच्या आशिया चषकापासून आतापर्यंत कोहलीने ४ शतके झळकावली आहेत. त्‍याने टी-20 मध्‍ये एक शतक आणि एकदिवसीयमध्‍ये ३ शतके झळकावली आहेत. कोहलीला त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये पाहून तो लवकरच अनुभवी सचिन तेंडुलकरचा ४९ एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडेल असे वाटत आहे. कोहली आणि सचिन यांच्यात अनेक दिवसांपासून तुलना होत आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सलाही याबाबत विचारले असता, त्याने मजेशीर उत्तर दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरूष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

पॅट कमिन्सने अनेक खेळाडूंप्रमाणे हा प्रश्न टाळला नाही. त्याने एका खेळाडूचे नाव घेतले. प्राईम व्हिडिओ इंडियाने यूट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये त्याचा सहकारी उस्मान ख्वाजा याने त्याला याबाबत प्रश्न विचारला होता. ख्वाजाने विचारले, "सचिन आणि विराट?" पॅट कमिन्सने आधी गंमतीने विचारले, "कशात?" जेवन बनवण्यात?'''''' मग कमिन्सने आपली निवड सांगितली.

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे नाव घेतले. कमिन्सने कोहलीची निवड करण्यामागे आपले तर्कही मांडले आहे. तो म्हणाला, “ मी सचिनविरुद्ध फक्त एकच टी-२० सामना खेळला होता, तोही अनेक वर्षांपूर्वी. त्यामुळे मी विराट कोहलीला सर्वोत्तम मानणार आहे.

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. कोहलीने सुरुवातीच्या दोन सामन्यात ८ आणि ११ धावा केल्या. तिसरा सामना २५ जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. विराटला या सामन्यात मोठी खेळी करून मालिका संपवायला आवडेल. याशिवाय तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतही दिसणार आहे. यावेळी विराट आणि पॅट कमिन्स यांच्यात स्पर्धा होईल.