मराठी बातम्या  /  क्रीडा  /  रोमन अब्रामोविच युगाचा अंत, ४० हजार कोटींना विकला गेला चेल्सी फुटबॉल क्लब

रोमन अब्रामोविच युगाचा अंत, ४० हजार कोटींना विकला गेला चेल्सी फुटबॉल क्लब

May 31, 2022, 12:09 PM IST

    • रोमन अब्रामोविच यांनी २००३ मध्ये चेल्सी फुटबॉल क्लब खरेदी केला होता.
चेल्सी फुटबॉल क्लब

रोमन अब्रामोविच यांनी २००३ मध्ये चेल्सी फुटबॉल क्लब खरेदी केला होता.

    • रोमन अब्रामोविच यांनी २००३ मध्ये चेल्सी फुटबॉल क्लब खरेदी केला होता.

अमेरिकन अब्जाधीश टॉड बोहली यांच्या लॉस एंजेलिस डॉजर्सने चेल्सी फुटबॉल क्लब खरेदी केला आहे. २.५ अब्ज पाऊंड म्हणजेच २३ हजार ७३९ कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला आहे. टॉड बोहली यांनी रशियन अब्जाधीश रोमन अब्रामोविच यांच्याकडून चेल्सी फुटबॉल क्लब विकत घेतला आहे. याशिवाय या क्लबमध्ये सुधारणा करण्यासाठी संघात आणि स्टेडियममध्ये १.७५ अब्ज पाऊंड म्हणजेच १६ हजार ६१७ कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत. हा संपूर्ण व्यवहार एकूण ४० हजार ३६७ कोटींमध्ये झाल्याचे समजते आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

चेल्सी हा क्लब १९ वर्षांपासून अब्रामोविच यांच्याकडे होता, परंतु रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर याचा परिणाम या क्लबवरही झाला. या क्लबवर ब्रिटनमध्ये निर्बंध लादले गेले, त्यानंतरच अब्रामोविच यांनी हा प्रीमियर लीग क्लब विकण्याचा निर्णय घेतला. जवळपास दोन महिन्यांच्या प्रक्रियेनंतर, क्लबच्या विक्रीचा करार पूर्ण झाला आहे. अब्रामोविच यांच्याकडे चेल्सी क्लबचा परवाना ३१ मे पर्यंत होता, तो आता संपला आहे. आता टॉड बोहली यांच्या लॉस एंजेलिस डॉजर्सने या क्लबचा पूर्ण ताबा मिळवला आहे.

चेल्सीने त्यांच्या वेबसाइटवर लिहिले की, "चेल्सी फुटबॉल क्लब हे जाहीर करतो की टॉड बोहली, क्लियरलेक कॅपिटल, मार्क वॉल्टर आणि हॅन्सजॉर्ग वाईज यांच्या नेतृत्वाखालील गटाला चेल्सी क्लबची मालकी सोपवण्यात आली आहे'.

दरम्यान, रोमन अब्रामोविच यांनी २००३ मध्ये चेल्सी फुटबॉल क्लब खरेदी केला होता. तेव्हापासून चेल्सीने इंग्लिश फुटबॉल चॅम्पियनशिप पाच वेळा, इंग्लिश कप तीन वेळा आणि UEFA चॅम्पियन्स लीग आणि UEFA युरोपीयन लीग ही दोनदा जिंकली आहे.

विभाग