मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant Surgery: ऋषभ पंतच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, तब्येतीत झपाट्याने सुधारणा

Rishabh Pant Surgery: ऋषभ पंतच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, तब्येतीत झपाट्याने सुधारणा

Jan 07, 2023, 01:57 PM IST

    • Rishabh Pant Knee Surgery Successfull: ऋषभ पंतवर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.
Rishabh Pant Surgery

Rishabh Pant Knee Surgery Successfull: ऋषभ पंतवर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

    • Rishabh Pant Knee Surgery Successfull: ऋषभ पंतवर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

Rishabh Pant car accident: ऋषभ पंतचा शुक्रवारी (३० डिसेंबर) उत्तराखंडमधील रुरकी येथे अपघात झाला. यानंतर पंतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋषभ पंतवर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. सध्या पंत वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असून त्याच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

डुलकी लागली आणि कार डिव्हायडरला धडकली

ऋषभ पंतचा हा अपघात रुरकीजवळील गुरुकुल नारसन परिसरात घडला. पंत स्वतः कार चालवत होता. अपघातानंतर पंतने सांगितले की, गाडी चालवताना त्याला डुलकी लागली आणि कार डिव्हायडरला धडकली. त्यानंतर विंड स्क्रिन तोडत तो बाहेर आला. यानंतर गाडीला भीषण आग लागली.

या अपघाताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अपघातानंतर रुरकीमध्येच प्राथमिक उपचारानंतर पंतला डेहराडून येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर बीसीसीआयने डीडीसीएला पंतच्या सतत संपर्कात राहण्याचे निर्देश दिले होते आणि त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. DDCA प्रमुख श्याम शर्मा स्वतः पंतला भेटायला आले होते. याशिवाय उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेही पंतला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

पंत ४ जानेवारीला एअरलिफ्ट करण्यात आले

त्यानतर ४ जानेवारी रोजी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (DDCA) मोठा निर्णय घेतला आणि पंतला उपचारासाठी मुंबईला हलवले. त्याला एअरलिफ्ट करण्यात आले. पंतच्या कपाळावर दोन कट असल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. त्याच्या उजव्या गुडघ्यातील अस्थिबंधन (लिगामेंट) फाटले असून उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला, पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. तसेच, त्याच्या पाठीवर मोठ्या प्रमाणात जखमा आहेत. आगामी एकदिवसीय विश्वचषक पाहता बीसीसीआयला पंतला लवकरात लवकर तंदुरुस्त पाहायचे आहे.