मराठी बातम्या  /  क्रीडा  /  कोण आहे निखत झरीन? फेडरेशनसह मेरी कोमशी भांडली, बनली वर्ल्ड चॅम्पियन

कोण आहे निखत झरीन? फेडरेशनसह मेरी कोमशी भांडली, बनली वर्ल्ड चॅम्पियन

May 20, 2022, 05:44 PM IST

    • ज्या मेरी कॉमला आदर्श मानते तिच्याविरोधात हक्कासाठी निखत भांडलीसुद्धा, त्यासाठी तिने फेडरेशनसोबत वादही घातला होता.
भारतीय बॉक्सर निखत झरीन (फोटो - पीटीआय)

ज्या मेरी कॉमला आदर्श मानते तिच्याविरोधात हक्कासाठी निखत भांडलीसुद्धा, त्यासाठी तिने फेडरेशनसोबत वादही घातला होता.

    • ज्या मेरी कॉमला आदर्श मानते तिच्याविरोधात हक्कासाठी निखत भांडलीसुद्धा, त्यासाठी तिने फेडरेशनसोबत वादही घातला होता.

भारतीय बॉक्सर निखत झरीनने गुरुवारी इस्तांबूल इथं झालेल्या महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये ५२ किलो वजनी गटात विजेतेपद पटकावलं. तिने अंतिम सामन्यात थायलंडच्या जितपोंग जुटामस हिला ५-० ने पराभूत केलं. वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सर ठरली आहे. निखत झरीनने थायलंडच्या जितपोंगविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

निखतच्या आधी भारताच्या पाच महिला बॉक्सरनी अशी कामगिरी केली आहे. यात सर्वाधिक ६ वेळा एमसी मेरी कोम वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. तर सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा केसी यांनीही विजेतेपद जिंकलं आहे. वयाच्या तेराव्या वर्षी बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरलेली निखत झरीन ही मेरी कोमला आदर्श मानते. विशेष म्हणजे ज्या मेरी कॉमला आदर्श मानते तिच्याविरोधात हक्कासाठी निखत भांडलीसुद्धा, त्यासाठी तिने फेडरेशनसोबत वादही घातला होता.

<p>Nikhat Zareen pose for a photograph with a gold medal after winning the Women's World Boxing Championship final match against Thailand's Jitpong Jutamas, in Istanbul&nbsp;</p>

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या मेरी कॉमला ऑलिम्पिकमध्ये ट्रायलशिवाय ५१ किलो वजनी गटात निवडलं होतं. त्यावेळी फेडरेशनच्या नियमानुसार महिला आणि पुरुष वर्गातील पदक विजेत्यांनाच ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत पाठवलं जात होतं. मात्र हा नियम फक्त सुवर्ण आणि रौप्य पदक विजेत्यांसाठी होता. यामुळे निखतला पात्रता पेरीसाठी मेरी कोमविरोधात रिंगमध्येही उतरू दिलं नाही.

निखतने तत्कालीन समितीचे अध्यक्ष राजेश भंडारी यांनी सांगितलं होतं की, "निखतला भविष्याच्या दृष्टीने तयार करत आहे." फेडरेशनच्या भूमिकेविरोधात निखतने आवाज उठवला होता. तिने क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांना पत्र लिहून ट्रायल्सची मागणी केली होती. ट्रायलमध्ये तिला मेरी कोमविरोधात पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा सामन्यानंतर मेरीकॉमने तिच्याशी हस्तांदोलनसुद्धा केलं नव्हतं.