मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Neeraj Chopra: प्रत्येक स्पर्धेत पदकांची कमाई करणाऱ्या नीरजचा आजवरचा प्रवास

Neeraj Chopra: प्रत्येक स्पर्धेत पदकांची कमाई करणाऱ्या नीरजचा आजवरचा प्रवास

Jul 25, 2022, 03:30 PMIST

राष्ट्रकुल २०२२ स्पर्धा (Commonwealth Games 2022) तोंडावर आली आहे. २८ जुलैपासून बर्मिंगहममध्ये या खेळांना सुरुवात होणार आहे. स्पर्धेत भारताचा २१५ सदस्यीय संघ सामील होणार आहे. यात १०८ पुरूष आणि १०७ महिला खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताला नीराज चोप्राकडून (neeraj chopra) सर्वाधिक आशा आहेत. नीरजने नुकतेच जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावून इतिहास रचला आहे. तसेच त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

  • राष्ट्रकुल २०२२ स्पर्धा (Commonwealth Games 2022) तोंडावर आली आहे. २८ जुलैपासून बर्मिंगहममध्ये या खेळांना सुरुवात होणार आहे. स्पर्धेत भारताचा २१५ सदस्यीय संघ सामील होणार आहे. यात १०८ पुरूष आणि १०७ महिला खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताला नीराज चोप्राकडून (neeraj chopra) सर्वाधिक आशा आहेत. नीरजने नुकतेच जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावून इतिहास रचला आहे. तसेच त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
नीरज चोप्रा हे नाव आज संपूर्ण जगाला परिचित आहे. नीरजने आपल्या खेळातून जगभर ओळख मिळवली आहे.  नीरजने आधी २०१८ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून जगभर दहशत निर्माण केली.
(1 / 10)

यानंतर आता नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी इतिहास रचला आहे. रौप्यपदक जिंकून त्याने देशाला चॅम्पियनशिपच्या इतिहासातील दुसरे पदक मिळवून दिले आहे. भारताने २००३ मध्ये लांब उडीत जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पहिले पदक जिंकले होते. अंजू बॉबी जॉर्ज हिने ती ऐतिहासिक कामगिरी केली होती.
(2 / 10)

नीरजसाठी हे सर्व वाटते तितके सोपे कधीच नव्हते. कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर २०१९ हे वर्ष नीरजसाठी खूप वाईट होते. 
(3 / 10)

दुखापती आणि नंतर शस्त्रक्रियेमुळे तो जवळपास ६ महिने मैदानापासून दूर होता. नीरजला ज्या हाताने भाला फेकायचा त्याच हातावर शस्त्रक्रिया करावी लागली.
(4 / 10)

  नीरजला कोपराला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांचे करिअर धोक्यात आले होते, परंतु वेळेवर उपचार झाल्यामुळे तो बरा झाला. नीरजवर शस्त्रक्रिया करणारे ऑर्थोपेडिक सर्जन दिनशॉ पार्डीवाला यांनी ही माहिती दिली.
(5 / 10)

नीरजचा उजव्याा हाताचा कोपरा 'लॉक' स्थितीत होता. त्याच्यावर ३ मे २०१९ रोजी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. 
(6 / 10)

यानंतर नीरजला चार महिने रिहॅब प्रक्रियेतून जावे लागले. पण त्यानंतर सर्व काही ठीक झाले.
(7 / 10)

मात्र, त्यानंतर जगभरात कोरोना महामारी पसरली. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकही एक वर्ष पुढे ढकलण्यात आले. पण नीरजने सरावात कोणतीही कसर सोडली नाही. शस्त्रक्रियेनंतर नीरजने आपले हात मजबूत केले, ज्याच्या आधारेच तो आज इतिहास घडवत आहे.
(8 / 10)

नीरजने ७ ऑगस्ट २०२१ रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. त्याने ऑलिम्पिकमधील ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत ८७.५८ मीटर अंतरावर भालाफेक करून देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
(9 / 10)

Neeraj chopra
(10 / 10)
Neeraj chopra(all photo- Neeraj chopra instagram)

    शेअर करा