मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Murali Vijay : भारताचा सलामीवीर मुरली विजयचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

Murali Vijay : भारताचा सलामीवीर मुरली विजयचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

Jan 30, 2023, 05:28 PM IST

  • Murali Vijay Retirement: भारताच्या आणखी एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या या खेळाडूने ट्विटरच्या माध्यमातून निवृत्ती जाहीर केली.

Murli Vijay and Ravindra Jadeja

Murali Vijay Retirement: भारताच्या आणखी एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या या खेळाडूने ट्विटरच्या माध्यमातून निवृत्ती जाहीर केली.

  • Murali Vijay Retirement: भारताच्या आणखी एका खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या या खेळाडूने ट्विटरच्या माध्यमातून निवृत्ती जाहीर केली.

Murli Vijay Retirement: भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजयने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विजयने स्वत: ट्विटरच्या पोस्ट करत त्याने याबाबतची माहिती दिली. निवृत्तीची घोषणा करताना विजय मुरली भावूक झाल्याचे पाहायाला मिळाले. आपल्या कारकिर्दी दरम्यान सहयोग करणाऱ्या कुटुंब, मित्रपरिवार व चाहत्यांचे त्याने आभार मानले. विजयने त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थमध्ये खेळला होता.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

मुरली विजयने निविृत्तीची घोषणा करताना म्हटलंय की “आज मी कृतज्ञता आणि नम्रतेने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतो. २००२-२०१८ हा माझा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक वर्षांपैकी एक असेल. कारण देशाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्ज आणि केमप्लास्ट सनमार यांनी मला दिलेल्या संधींबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच माझे सर्व सहकारी, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि सपोर्ट स्टाफ तुमच्यासोबत खेळणे, हे माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असतील. ज्या क्रिकेट चाहत्यांनी आंतरराष्ट्रीय खेळाच्या चढ-उतारात मला साथ दिली आणि मी तुम्हा सर्वांसोबत घालवलेले क्षण नेहमीच माझ्या लक्षात राहतील. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे."

मुरली विजयने ६१ कसोटी, १७ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मुरली विजयच्या नावावर ३ हजार ९८२ धावांची नोंद आहे. ज्यात १२ शतक आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मुरली विजयने ३३९ धावा केल्या आहेत. तर, टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १६९ धावा केल्या आहेत.

विभाग