मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni : धोनी सर्वाधिक नियम मोडणारा सेलिब्रेटी, विराट-भुवन बामचाही यादीत समावेश, पाहा

MS Dhoni : धोनी सर्वाधिक नियम मोडणारा सेलिब्रेटी, विराट-भुवन बामचाही यादीत समावेश, पाहा

May 19, 2023, 10:43 PM IST

    • ms dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी जाहिरात नियमांचे उल्लंघन करण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाने एक मोठा खुलासा केला आहे.
ms dhoni bhuvan bam

ms dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी जाहिरात नियमांचे उल्लंघन करण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाने एक मोठा खुलासा केला आहे.

    • ms dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी जाहिरात नियमांचे उल्लंघन करण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाने एक मोठा खुलासा केला आहे.

ms dhoni bhuvan bam : महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कमान सांभाळत आहे. या दरम्यान, एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमधून महेंद्रसिंग धोनीवर गंभीर आरोप लावण्यात आला आहे. सेलिब्रेटी ज्या उत्पादनांची जाहिरात करतात, त्या जाहिरातींशी संबंधित नियमांचे सर्वाधिक उल्लंघन हे धोनी करत असल्याचे समोर आले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

खरं तर, जाहिरातींसाठी Advertising Standards Council of India स्वयं-नियामक प्राधिकरण असलेल्या अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) ने एक अहवाल जारी केला आहे. ज्यामध्ये हा खुलासा करण्यात आला आहे.

अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींविरुद्ध तक्रारी वाढल्या आहेत आणि अनेकांनी ड्यू डिलिजेन्सची प्रक्रिया (एक प्रकारची तपास प्रक्रिया) पूर्ण केली नसल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. 

ASCI च्या रिपोर्टनुसार, नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींमध्ये एक वर्षापूर्वीच्या तुलनेत सध्या ८०३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२३ मध्ये सेलिब्रिटींनी केलेल्या जाहिरातींमधील तक्रारींची संख्या ५०३ वर पोहोचली आहे. एक वर्षापूर्वी हा आकडा केवळ ५५ होता.

ASCI कडून सांगण्यात आले की, सेलिब्रिटी बरेच नियम तोडत आहेत. प्रसिद्ध व्यक्तींकडून एखाद्या उत्पादनाची जाहिरात केली जाते तेव्हा आवश्यक औपचारिकताही पूर्ण केल्या जात नाहीत. या बाबतीत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. ASCI ने सांगितले की धोनी अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जो जाहिरातीपूर्वी योग्य परिश्रम करत नाही.

कॉमेडियन भुवन बाम याचाही नियमभंगाच्या या प्रकरणात सहभाग आहे. त्याच्यावर नियमभंगाचे एकूण ७ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये सेलिब्रेटींची जवळपास निम्मी प्रकरणे गेमिंग, टेक्निकल एज्यूकेशन, आरोग्य सेवा आणि वैयक्तिक काळजी या श्रेणीतील आहेत.

विशेष म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार जर एखादी सेलिब्रिटी एखाद्या जाहिरातीत दिसली तर त्याबाबतची सर्व माहिती त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे.