मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni Video: धोनीचा साधेपणा! माहीची छोटीशी कृती लोकांच्या मनात घर करून गेली

MS Dhoni Video: धोनीचा साधेपणा! माहीची छोटीशी कृती लोकांच्या मनात घर करून गेली

Aug 10, 2022, 07:00 PM IST

    • MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे बंद केले असले तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. 'थाला' या नावाने प्रसिद्ध असलेल्या धोनीने रांची विमानतळावरील आपल्या वर्तनाने चाहत्यांचे मन जिंकले आहे.
ms dhoni

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे बंद केले असले तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. 'थाला' या नावाने प्रसिद्ध असलेल्या धोनीने रांची विमानतळावरील आपल्या वर्तनाने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

    • MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे बंद केले असले तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. 'थाला' या नावाने प्रसिद्ध असलेल्या धोनीने रांची विमानतळावरील आपल्या वर्तनाने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बराच काळ लोटला असला तरी त्याची फॅन फॉलोइंग अजूनही कायम आहे. धोनी हा अतिशय साधेपणाने राहतो. तसेच, ग्लॅमरच्या दुनियेपासून कोसो दूर असतो. तर फावल्या वेळेत त्याला त्याच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत वेळ घालवायला आवडते.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

मात्र, अशातच धोनीचा एक मन जिंकणार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये माहीने विमानतळावरील आपल्या सभ्य वर्तनाने लाखो लोकांची मने जिंकले आहेत.

महेंद्रसिंग धोनी रविवारी रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावरून चेन्नईला रवाना होत होता. यावेळी तो विमानतळावर चाहते आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसला. धोनीने विमानतळावरील अधिकाऱ्यांसोबत हस्तांदोलनही केले. यादरम्यान एक महिला पोलीस धोनीसोबत पायरीवर चालताना दिसत आहे. त्याचवेळी धोनी महिला पोलिसाशी बोलतानाही दिसत आहे.व्हिडीओमध्ये धोनीचा बेस्ट फ्रेंड चीतू देखील दिसत आहे. धोनीचा हा व्हिडिओ आता ट्विटरवर व्हायरल झाला आहे. धोनीच्या या सरळ आणि साध्या स्वभावाचे चाहते कौतुक करत आहेत.

महेंद्रसिंग धोनी ४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिला. तसेच, धोनीचा आणि चेन्नईचा संबंध ही काही नवीन गोष्ट नाही. २००८ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीचा कर्णधार बनला आणि तेव्हापासून त्याने चेन्नईचा कर्णधार म्हणून ४ आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत.