मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2022, KKR vs LSG: डी कॉकचं शतक; लुईसचा अप्रतिम झेल अन् केकेआर स्पर्धेबाहेर

IPL 2022, KKR vs LSG: डी कॉकचं शतक; लुईसचा अप्रतिम झेल अन् केकेआर स्पर्धेबाहेर

May 19, 2022, 11:36 AMIST

आयपीएलच्या (IPL) बुधवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) अवघ्या २ धावांनी पराभव झाला. लखनौने (LSG) दिलेल्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ २० षटकात ७ बाद २०८ धावाच करु शकला.

आयपीएलच्या (IPL) बुधवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) अवघ्या २ धावांनी पराभव झाला. लखनौने (LSG) दिलेल्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ २० षटकात ७ बाद २०८ धावाच करु शकला.

कोलकाताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावा हव्या होत्या. मात्र लखनौच्या मार्कस स्टोईनीसने उमेश यादवचा त्रिफळा उडवला.
(1 / 5)
कोलकाताला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावा हव्या होत्या. मात्र लखनौच्या मार्कस स्टोईनीसने उमेश यादवचा त्रिफळा उडवला.(IPL)
शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी २१ धावांची आवश्यकता होती. लखनौच्या मार्कस स्टोईनीसच्या पहिल्या ३ चेंडूंवर दोन षटकार आणि एका चौकाराच्या साह्याने रिंकू सिंगने १६ धावा वसूल केल्या. चौथ्या चेंडूवर दोन धावा मिळाल्या मात्र, पाचव्या चेंडूवर एविन लुईसने रिंकूचा अप्रतिम झेल टिपला आणि सामना लखनौच्या दिशेने फिरला.
(2 / 5)
शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी २१ धावांची आवश्यकता होती. लखनौच्या मार्कस स्टोईनीसच्या पहिल्या ३ चेंडूंवर दोन षटकार आणि एका चौकाराच्या साह्याने रिंकू सिंगने १६ धावा वसूल केल्या. चौथ्या चेंडूवर दोन धावा मिळाल्या मात्र, पाचव्या चेंडूवर एविन लुईसने रिंकूचा अप्रतिम झेल टिपला आणि सामना लखनौच्या दिशेने फिरला.(IPL)
शेवटच्या ४ षटकात कोलकाताचा रिंकू सिंग लखनौच्या विजयात अडथळा बनून उभा राहिला. रिंकूने १५ चेंडूत ४० धावा केल्या. त्याने ४ षटकार आणि २ चौकारांची आतिषबाजी केली.
(3 / 5)
शेवटच्या ४ षटकात कोलकाताचा रिंकू सिंग लखनौच्या विजयात अडथळा बनून उभा राहिला. रिंकूने १५ चेंडूत ४० धावा केल्या. त्याने ४ षटकार आणि २ चौकारांची आतिषबाजी केली.(IPL)
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सलामीच्या जोडीने २१० धावांची भागीदारी केली आहे. यातक्विंटन डी कॉक ७० चेंडूत (१४०) आणि केएल राहुलने ५१ चेंडूत (६८) धावा केल्या.  
(4 / 5)
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सलामीच्या जोडीने २१० धावांची भागीदारी केली आहे. यातक्विंटन डी कॉक ७० चेंडूत (१४०) आणि केएल राहुलने ५१ चेंडूत (६८) धावा केल्या.  (IPL)
लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने ७० चेंडूत नाबाद १४० धावा ठोकल्या. यात १० चौकार आणि १० गगनचुंबी षटकारांचा समावेश आहे.
(5 / 5)
लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने ७० चेंडूत नाबाद १४० धावा ठोकल्या. यात १० चौकार आणि १० गगनचुंबी षटकारांचा समावेश आहे.(IPL)

    शेअर करा