मराठी बातम्या  /  क्रीडा  /  KL Rahul IND VS AUS : रोज उठा, अंघोळ करा अन् आऊट व्हा… केएल राहुलच्या फ्लॉप शो'नंतर चाहत्यांची सटकली

KL Rahul IND VS AUS : रोज उठा, अंघोळ करा अन् आऊट व्हा… केएल राहुलच्या फ्लॉप शो'नंतर चाहत्यांची सटकली

Feb 19, 2023, 01:13 PM IST

    • kl rahul trolled ind vs aus test : केएल राहुल सातत्याने फ्लॉप ठरत आहे. दिल्ली कसोटीतही तो पूर्णपणे अपयशी ठरला आहे. पहिल्या डावात १७ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावातही तो १ धाव करून तंबूत परतला. यानंतर भारतीय क्रिकेट चाहते त्याच्यावर प्रचंड चिडले आहेत. 
KL Rahul IND VS AUS

kl rahul trolled ind vs aus test : केएल राहुल सातत्याने फ्लॉप ठरत आहे. दिल्ली कसोटीतही तो पूर्णपणे अपयशी ठरला आहे. पहिल्या डावात १७ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावातही तो १ धाव करून तंबूत परतला. यानंतर भारतीय क्रिकेट चाहते त्याच्यावर प्रचंड चिडले आहेत.

    • kl rahul trolled ind vs aus test : केएल राहुल सातत्याने फ्लॉप ठरत आहे. दिल्ली कसोटीतही तो पूर्णपणे अपयशी ठरला आहे. पहिल्या डावात १७ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावातही तो १ धाव करून तंबूत परतला. यानंतर भारतीय क्रिकेट चाहते त्याच्यावर प्रचंड चिडले आहेत. 

दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात ११३ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात एक धावेची आघाडी मिळाली होती. त्यामुळे भारतासमोर ११५ धावांचे लक्ष्य आहे. सामन्याचा निकाल आज लागणार हे निश्चित आहे. मात्र, ११५ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर केएल राहुल दुसऱ्या डावातदेखील फ्लॉप ठरला.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

राहुल १ धाव करून तंबूत परतला. त्याला नॅथल लायनने बाद केले. यानंतर केएल राहुल चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. या कसोटी मालिकेत राहुलची बॅटने आतापर्यंत कोणतीही खास कामगिरी झालेली नाही. नागपूर कसोटी सामन्यात तो २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्याचवेळी दिल्ली कसोटीत त्याने पहिल्या डावात १७ आणि दुसऱ्या डावात १ धाव केली. राहुलची ही कामगिरी पाहिल्यानंतर शुभमन गिलला संघात न घेतल्याने संघ व्यवस्थापनावर सातत्याने टीका होत आहे. त्याचवेळी चाहते सोशल मीडियावर राहुलला सतत ट्रोल करताना दिसत आहेत.

भारत-ऑस्ट्रेलिया दिल्ली कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र रवींद्र जडेजाच्या नावावर राहिले. त्याने पहिल्या सत्रात ७ बळी घेत कांगारू संघाला ११३ धावांवर गुंडाळण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याच्याशिवाय आर अश्विनने ३ गडी बाद केले

केएल राहुलने आपले शेवटचे कसोटी शतक २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केले होते. त्यानंतर १२ डावांत फलंदाजी केल्यानंतर त्याला केवळ एका डावात अर्धशतक झळकावता आले आहे. अशा परिस्थितीत त्याच्या संघातील स्थानावर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

लोकेश राहुलची वनडे फॉरमॅटमधील कामगिरी पाहिली तर त्यातही त्याच्या बॅटमधून १ वर्षाहून अधिक काळ झाला काही विशेष कामगिरी दिसून आलेली नाही. राहुलने मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान वनडेतील शेवटचे शतक झळकावले. तेव्हापासून त्याला १३ एकदिवसीय डावांपैकी केवळ ३ डावात अर्धशतक झळकावता आले आहे.