मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  INDvsENG: इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, ३ फास्ट तर २ फिरकीपटू

INDvsENG: इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, ३ फास्ट तर २ फिरकीपटू

Jun 27, 2022, 09:19 PMIST

टीम इंडिया सध्या इंग्लंड (india vs england) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला (team india) एक टेस्ट मॅच, तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. यापूर्वी आज आपण कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांचा आढावा घेणार आहोत.

  • टीम इंडिया सध्या इंग्लंड (india vs england) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला (team india) एक टेस्ट मॅच, तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. यापूर्वी आज आपण कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांचा आढावा घेणार आहोत.
इशांत शर्मा हा इंग्लंडमध्ये त्यांच्याविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. त्याने येथे १४ कसोटी सामन्यांमध्ये ४८ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची गोलंदाजीची सरासरी ३४ इतकी होती. त्याने इंग्लंडमध्ये दोनदा एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत.
(1 / 5)
इशांत शर्मा हा इंग्लंडमध्ये त्यांच्याविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. त्याने येथे १४ कसोटी सामन्यांमध्ये ४८ विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची गोलंदाजीची सरासरी ३४ इतकी होती. त्याने इंग्लंडमध्ये दोनदा एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत.(ishant sharma, instagram)
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देव येथे दुसऱ्या स्थानावर आहेत. कपिल देव यांनी इंग्लिश संघाविरुद्ध इंग्लंडमध्ये ४३ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची गोलंदाजीची सरासरी ३९.१८ इतकी आहे.
(2 / 5)
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देव येथे दुसऱ्या स्थानावर आहेत. कपिल देव यांनी इंग्लिश संघाविरुद्ध इंग्लंडमध्ये ४३ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची गोलंदाजीची सरासरी ३९.१८ इतकी आहे.(kapil dev, instagram)
या यादीत तिसरे स्थान अनुभवी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचे आहे. त्याने येथे इंग्लंडविरुद्धच्या १० कसोटी सामन्यांमध्ये ४१.४१ च्या गोलंदाजीच्या सरासरीने ३६ बळी घेतले आहेत.
(3 / 5)
या यादीत तिसरे स्थान अनुभवी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेचे आहे. त्याने येथे इंग्लंडविरुद्धच्या १० कसोटी सामन्यांमध्ये ४१.४१ च्या गोलंदाजीच्या सरासरीने ३६ बळी घेतले आहेत.(anil kumble, instagram)
भारताचे माजी फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी हे इंग्लंडमध्ये भारताचे चौथे सर्वात यशस्वी गोलंदाज आहेत. त्यांनी इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या १२ कसोटींमध्ये ३८.०८ च्या सरासरीने ३५ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीतील टॉप-५ गोलंदाजांमध्ये त्यांचा समावेश आहे. बेदींच्या नावावर इंग्लंडविरुद्ध ८५ विकेट्स आहेत.
(4 / 5)
भारताचे माजी फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी हे इंग्लंडमध्ये भारताचे चौथे सर्वात यशस्वी गोलंदाज आहेत. त्यांनी इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या १२ कसोटींमध्ये ३८.०८ च्या सरासरीने ३५ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीतील टॉप-५ गोलंदाजांमध्ये त्यांचा समावेश आहे. बेदींच्या नावावर इंग्लंडविरुद्ध ८५ विकेट्स आहेत.(angad bedi, instagram)
टीम इंडियाच्या सध्याच्या संघात समाविष्ट असलेल्या जसप्रीत बुमराहचाही टॉप-५ मध्ये समावेश आहे. बुमराहने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये केवळ ७ कसोटी सामन्यांमध्ये ३२ बळी घेतले आहेत. बुमराहची गोलंदाजीची सरासरीही उत्कृष्ट आहे. त्याने २३.०६ च्या सरासरीने बुमराहने विकेट्स घेतल्या आहेत.
(5 / 5)
टीम इंडियाच्या सध्याच्या संघात समाविष्ट असलेल्या जसप्रीत बुमराहचाही टॉप-५ मध्ये समावेश आहे. बुमराहने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये केवळ ७ कसोटी सामन्यांमध्ये ३२ बळी घेतले आहेत. बुमराहची गोलंदाजीची सरासरीही उत्कृष्ट आहे. त्याने २३.०६ च्या सरासरीने बुमराहने विकेट्स घेतल्या आहेत.(jaspreet bumrah, instagram)

    शेअर करा