मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG Viral Video: पदकवीर भारतात परतले, विमानतळावर जंगी स्वागत

CWG Viral Video: पदकवीर भारतात परतले, विमानतळावर जंगी स्वागत

Aug 09, 2022, 01:55 PM IST

    • Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने कुस्तीत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी १२ पदके जिंकली, ज्यात ६ सुवर्ण, १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये १० पदके आली. तर बॉक्सिंगमध्येही भारताने तीन सुवर्णांसह ७ पदके जिंकली आहेत.
CWG 2022 Video

Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने कुस्तीत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी १२ पदके जिंकली, ज्यात ६ सुवर्ण, १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये १० पदके आली. तर बॉक्सिंगमध्येही भारताने तीन सुवर्णांसह ७ पदके जिंकली आहेत.

    • Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने कुस्तीत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी १२ पदके जिंकली, ज्यात ६ सुवर्ण, १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये १० पदके आली. तर बॉक्सिंगमध्येही भारताने तीन सुवर्णांसह ७ पदके जिंकली आहेत.

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत चमक दाखवणारे भारतीय खेळाडू आता मायदेशी परतले आहेत. विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. चाहत्यांसह विमानतळावरील कर्मचाऱ्यांनीही टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचे स्वागत केले.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचा समारोप सोमवारी (१२ ऑगस्ट) रात्री उशिरा रंगारंग कार्यक्रमाने झाला. या समारोप समारंभात टेबल टेनिसपटू शरथ कमल आणि महिला बॉक्सर निखत झरीन हे भारतीय संघाचे ध्वजवाहक होते.

स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (SAI) भारतीय खेळाडूंचा भारतात परतल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. सर्व खेळाडू वेगवेगळ्या फ्लाइटमधून त्यांच्या ग्रुपसह मायदेशी परतले आहेत.

भारताने २२ सुवर्णांसह ६१ पदके जिंकली

यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने २२ सुवर्णांसह एकूण ६१ पदके जिंकली आहेत. यात १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचाही समावेश आहे. भारत पदकतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिला. बर्मिंगहॅम गेम्सच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (८ ऑगस्ट) भारताने चार सुवर्णांसह एकूण ६ पदके जिंकली. आता पुढील कॉमनवेल्थ गेम्स चार वर्षांनंतर ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे होणार आहेत.

यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने कुस्तीत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. भारतीय कुस्तीपटूंनी १२ पदके जिंकली, ज्यात ६ सुवर्ण, १ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. यानंतर वेटलिफ्टिंगमध्ये १० पदके आली. तर बॉक्सिंगमध्येही भारताने तीन सुवर्णांसह ७ पदके जिंकली आहेत.