मराठी बातम्या  /  क्रीडा  /  U19 T20 World Cup 2023: विश्वचषकविजेत्या मुलींचा ‘काला चष्मा’ गाण्यावर हटके डान्स; व्हिडिओ व्हायरल

U19 T20 World Cup 2023: विश्वचषकविजेत्या मुलींचा ‘काला चष्मा’ गाण्यावर हटके डान्स; व्हिडिओ व्हायरल

Jan 30, 2023, 11:26 AM IST

  • ICC U19 Women's T20 World Cup Champions: महिला अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर भारतीय मुलींनी काला चष्मा गाण्यावर डान्स केला.

India U19 Women's Team

ICC U19 Women's T20 World Cup Champions: महिला अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर भारतीय मुलींनी काला चष्मा गाण्यावर डान्स केला.

  • ICC U19 Women's T20 World Cup Champions: महिला अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर भारतीय मुलींनी काला चष्मा गाण्यावर डान्स केला.

India U19 Women's Team Kala Chashma Dance Video: महिला अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने इंग्लंडचा सात विकेट्सने पराभव केला. विश्वचषकचा पहिला हंगाम जिंकून भारताने इतिहास रचला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेत भारताचा तिरंगा फडकावला. ऐतिहासिक विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय अंडर-१९ महिला संघाने मैदानावर जल्लोष केला. नुकताच आयसीसीने भारतीय महिलांचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात विश्वविजेत्या मुली बॉलिवूडमधील प्रसिद्ध काला चष्मा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऋषिता बासू, सौम्या तिवारी, तितास साधु आणि पार्श्वी चोप्रा डान्स करताना दिसत आहेत. ऋषिता बासू-सौम्या तिवारी डान्समध्ये आघाडीवर होत्या. याशिवाय, तितास साधु, पार्श्वी चोपडा यांची पावल सुद्धा थिरकली. विजेत्यासंघाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तितास साधू, अर्चना देवी आणि पर्शावी चोप्रा यांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा डाव ६८ धावांवर आटोपला. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने १४व्या षटकातच विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरले. या सामन्यात तितास साधूला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

भारतीय महिला अंडर-१९ संघ:

शेफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत, सौम्या तिवारी, गोंगडी त्रिशा, ऋचा घोष (विकेटकीपर), हृषिता बसू, तितास साधू, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, सोनम यादव, सोप्पधंडी यशश्री, फलक नाझ, शबनम एमडी, सोनिया मेंधिया, हर्ले गाला.

विभाग