मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Axar Patel Wedding: केएल राहुल पाठोपाठ अक्षर पटेलनंही उरकवलं लग्न; धुमधडाक्यात निघाली वरात

Axar Patel Wedding: केएल राहुल पाठोपाठ अक्षर पटेलनंही उरकवलं लग्न; धुमधडाक्यात निघाली वरात

Jan 27, 2023, 09:31 AM IST

  • Axar Patel- Meha Patel Wedding Video: भारताचा स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेलने गुरुवारी त्याची मैत्रीण मेहा पटेलशी लग्न केले आहे .

Axar Patel- Meha Patel Wedding

Axar Patel- Meha Patel Wedding Video: भारताचा स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेलने गुरुवारी त्याची मैत्रीण मेहा पटेलशी लग्न केले आहे .

  • Axar Patel- Meha Patel Wedding Video: भारताचा स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेलने गुरुवारी त्याची मैत्रीण मेहा पटेलशी लग्न केले आहे .

Axar Patel- Meha Patel Wedding: भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू एकापाठोपाठ लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. भारताचा स्टार फलंदाज केएल राहुलने २३ जानेवारीला बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टीशी विवाह केला. त्यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनेही गुरुवारी (२६ जानेवारी) त्याची मैत्रीण मेहा पटेलशी लग्नगाठ बांधली. गुजरातमधील वडोदरा येथे लग्न हा लग्न सोहळा पार पडला. अक्षर पटेल आणि मेहा पटेलच्या लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

अक्षर पटेल आणि मेहा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. मेहा आणि अक्षर यांचा गेल्या वर्षीच साखरपुडा झाला होता. आता दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. मेहा पटेल व्यवसायाने न्यूट्रिशनिस्ट आहेत. ती सोशल मीडियावर डाएट प्लॅनही शेअर करते. अक्षर पटेल आणि मेहा अनेकवेळा एकत्र सुट्टी घालवताना दिसले आहेत. नुकतेच दोघांचे अमेरिकेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

अक्षर पटेलने या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली होती, ज्यामध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. भारतीय संघाने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. अक्षरने लग्नासाठी या दोन्ही मालिकांमधून ब्रेक घेतला आहे.

मेहा पटेल कोण आहे?

मेहा पटेल व्यवसायाने न्यूट्रिशनिस्ट आहेत. ती सोशल मीडियावर डाएट प्लॅनही शेअर करते. मेहा पटेल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.तिची इंस्टग्राम प्रोफाईल पाहिली असता तिला फिरायला खूप आवडते, असे लक्षात येते. मेहा पटेलच्या इंस्टाग्राम हायलाइट्समध्ये तिच्या दुबई, गोवा आणि स्कॉटलंडच्या सहलींचाही समावेश आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर मेहा पटेलचे २१ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

विभाग