मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs WI: भारताचा विंडीज दौरा; पाहा सामन्याची वेळ, ठिकाणांसह संपूर्ण वेळापत्रक

IND vs WI: भारताचा विंडीज दौरा; पाहा सामन्याची वेळ, ठिकाणांसह संपूर्ण वेळापत्रक

Jul 19, 2022, 07:09 PM IST

    • वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies 2022) या दौऱ्यावर शिखर धवन वनडे मालिकेचे कर्णधारपद भुषवणार आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या हे वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग नसतील. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे.
india vs west indies

वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies 2022) या दौऱ्यावर शिखर धवन वनडे मालिकेचे कर्णधारपद भुषवणार आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या हे वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग नसतील. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे.

    • वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies 2022) या दौऱ्यावर शिखर धवन वनडे मालिकेचे कर्णधारपद भुषवणार आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या हे वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग नसतील. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे.

टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजसोबत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि ५ सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा २२ जुलैपासून सुरू होणार आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक, भारतीय वेळेनुसार सामन्यांची वेळ आणि दोन्ही संघ या ठिकाणी जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ (India vs West Indies 2022) सामन्यांची वनडे मालिका २२ जुलैपासून सुरू होणार आहे. यानंतर दुसरा वनडे २४ जुलैला आणि तिसरा वनडे २७ जुलैला खेळवला जाईल. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील. सर्व सामने त्रिनिदादमध्ये खेळवले जाणार आहेत.

२९ जूलैपासून टी-२० मालिका- 

तर २९ जुलैपासून ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला T20 त्रिनिदादमध्ये, दुसरा आणि तिसरा T20 सेंट किट्समध्ये आणि शेवटचे दोन T20 फ्लोरिडामध्ये खेळवले जाणार आहेत. टी-20 मालिकेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून सुरु होतील.

वनडेसाठी शिखर धवन कॅप्टन-

वेस्ट इंडिजविरुद्धच्या या दौऱ्यावर शिखर धवन वनडे मालिकेचे कर्णधारपद भुषवणार आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या हे वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग नसतील. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. 

टी-२० मध्ये रोहित शर्मा कॅप्टन-

रोहित शर्मा टी-20 मालिकेत भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. तो टी-२० मध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा हे देखील टी-२० संघात असतील. मात्र, विराट कोहली वनडे आणि टी-२० मालिकेत दिसणार नाही. 

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

पहिली वनडे - २२ जुलै (त्रिनिदाद)

दुसरी वनडे - २४ जुलै (त्रिनिदाद)

तिसरी वनडे - २७ जुलै (त्रिनिदाद)

टी-२० मालिकेचे वेळापत्रक-

पहिली T20 - २९ जुलै (त्रिनिदाद)

दुसरी टी२०-  १ ऑगस्ट (सेंट किट्स)

तिसरी T20 -  २ ऑगस्ट (सेंट किट्स)

चौथी T20 -  ६ ऑगस्ट लॉडरहिल, फ्लोरिडा

पाचवा T20- ७  ऑगस्ट लॉडरहिल, फ्लोरिडा.

वनडेसाठी भारतीय संघ:

 शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल , अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

T20I साठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिष्णोई, कुलगुरू भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.