मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG: जसप्रीत बुमराहचा नवा रेकॉर्ड, गोलंदाजांच्या खास क्लबमध्ये सामील

IND vs ENG: जसप्रीत बुमराहचा नवा रेकॉर्ड, गोलंदाजांच्या खास क्लबमध्ये सामील

Jul 12, 2022, 07:56 PM IST

    • भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने आठ षटकांतच अर्धा इंग्लिश संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता.
Jasprit Bumrah

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने आठ षटकांतच अर्धा इंग्लिश संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता.

    • भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने आठ षटकांतच अर्धा इंग्लिश संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळवला जात आहे. टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता वनडे मालिकाही जिंकण्यावर टीम इंडियाचे लक्ष विजयाने सुरुवात करायची आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

दरम्यान, पहिल्याच वनडे सामन्यात भारताच्या जसप्रीत बुमराहने इंग्लंडची दाणादाण उडवली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने आठ षटकांत अर्धा इंग्लिश संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. यादरम्यान बुमराहने एक विशेष कामगिरी केली.

बुमराहने सामन्यात अवघ्या १९ धावा देत ६ गडी बाद केले. विशेष म्हणजे त्याने पहिले ४ विकेट हे सुरुवातीच्या ८ षटकांमध्येच घेतले होते. 

बुमराह २००२ नंतर वनडेच्या पहिल्या १० षटकात ४ विकेट घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी २००३ मध्ये जवागल श्रीनाथने जोहान्सबर्गमध्ये श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी केली होती. दहा वर्षांनंतर २०१३ मध्ये भुवनेश्वर कुमारने पोर्ट ऑफ स्पेन येथे श्रीलंकेविरुद्ध सुरुवातीच्या १० षटकांत ४ विकेट घेतल्या होत्या.

तत्पूर्वी, पहिल्या वन-डे सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात दोन विकेट घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. जेसन रॉयला क्लीन बोल्ड केल्यानंतर जो रुटही शून्यावर यष्टिरक्षक ऋषभ पंतकडे झेलबाद झाला. इंग्लंडचे तीन फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. जेसन रॉय आणि जो रूटनंतर बेन स्टोक्सही शून्यावर बाद झाला. मोहम्मद शमीने त्याला ऋषभ पंतकरवी झेलबाद केले.

इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक ३० धावा केल्या. त्याने ३२ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार ठोकले.  इंग्लंडचा डाव २५.२ षटकातच ११० धावांवर गारद झाला आहे. भारताकडून बुमराहने ६ तर मोहम्मद शमीने ३ गडी  बाद केले.